मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडला नवरदेव, पोलिसांनी चेकपोस्टवरच लावून दिलं लग्न

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडला नवरदेव, पोलिसांनी चेकपोस्टवरच लावून दिलं लग्न

Lockdown मध्ये लग्नासाठी नवऱ्याकडं परवानगी पत्र होतं पण नवरीकडे नव्हतं. तेव्हा पोलिसांनीच यातून मार्ग काढत चेकपोस्टवर लग्न लावून दिलं.

  • Published by:  Suraj Yadav
नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असतानाही अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. या काळात काही लग्नंही झाल्याची उदाहरणं आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालनही केलं गेलं. मात्र आता एक अनोखं लग्न झालं. चेक पोस्टवरच पोलिसांनी लग्न लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, उत्तराखंडमधील काशीपूर इथं नवरदेव त्याच्या काही नातेवाईकांसह पोहोचला. तो नवरीच्या घरी निघाला होता. त्याच्याकडे प्रशासनाकडून यासाठी परवानगी घेण्यात आली होती. मात्र नवरीच्या घरच्यांनी अशी परवानगी घेतली नव्हती. इकडं नवरा तयार होईन घरची काही  मंडळी घेऊन पोहोचला होता. तेव्हा काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी यावर उपाय शोधून काढत वधुलाच तिथे बोलावलं आणि लग्न लावून दिलं. या लग्नाला पाच लोक आणि भटजी उपस्थित होते. यानंतर नवरी पतीसोबत सासरी गेली. थाना मूंडापाडे इथल्या विक्रम सिंगचे बरखेडा पांडे इथल्या मुलीशी लग्न ठरलं होतं. रविवारी विक्रम बहिणीला सोबत घेऊन लग्नासाठी काशीपूर इथं पोहोचला होता. हे वाचा : रिकाम्या पोटी धरली 1400 किमी दूर असलेल्या गावाकडची वाट, मजूराचा वाटेतच मृत्यू दरम्यान, वाटेत पैगा चौकीवर पोलिसांनी दोघांनाही थांबवलं. तेव्हा दोघांकडे प्रशासनाकडून देण्यात आलेलं परवानगी पत्र होतं. मात्र नवरीने अशी कोणतीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी नवरीला तिच्या घरच्यांसह चेकपोस्टवर बोलावलं. तिथंच भटजीला बोलावून लग्न लावून दिलं. पोलिसांच्या तंबूशेजारीच लग्नाचे विधी पार पाडले. या लग्नावेळी सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्यात आलं. दोन्हीकडचे मिळून पाच लोक यासाठी उपस्थित होते. लग्नानंतर नवरीची चेकपोस्टवरूनच पाठवणी करण्यात आली. हे वाचा : आजोबांसाठी कबर खोदत होता नातू , शेवटी दोघांनाही एकत्रच दफन करण्याची आली वेळ
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या