VIDEO : जागतिक नेत्यांना 16 वर्षीय ग्रेटाचा प्रश्न, तुमची हिम्मतच कशी झाली?

VIDEO : जागतिक नेत्यांना 16 वर्षीय ग्रेटाचा प्रश्न, तुमची हिम्मतच कशी झाली?

जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता चर्चेची वेळ संपली असून जगाने कृती करायला हवी असं म्हटलं. उद्घाटनावेळी ग्रेटानं संताप व्यक्त करत जागतिक नेत्यांना इशारा दिला.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : जागतिक हवामान परिषदेत पुन्हा एकदा ग्रेट थम्बर्गने संतप्त भावना व्यक्त केल्या. जगभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थिती केलेल्या भाषणात तिनं खडेबोल सुनावले. पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. तुम्ही आमचं बालपणं, आमची स्वप्न हिरावून घेतलीत. तुमची हिम्मत कशी झाली? असा प्रश्न तिनं विचारला आहे. यावेळी ग्रेटाला भावनाही अनावर झाल्या.

पर्यावरणाच्या हानीबद्दल काहीच केलं जात नाहीत. जागतिक स्तरावर नेत्यांनी प्रयत्न केलेले नाहीत. याचे परिणाम भावी पिढीला भोगावे लागत आहेत असं ग्रेटा म्हणाली. डोळ्यात अश्रू आणि शब्दांतून राग व्यक्त करत ग्रेटानं भाषण केलं. ग्रेटानं नेत्यांना इशारा देताना म्हटलं की, जर तुम्ही पुन्हा अयशस्वी झालात तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही . नेत्यांकडून फक्त आश्वासनं दिली जात आहेत. लोक मरत आहेत. पर्यावरण संपुष्टात येत आहे. आज आणि या क्षणी एक मर्यादा घालण्याची गरज आहे असंही ग्रेटा म्हणाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील जागतिक हवामान परिषदेत भाषण केलं. यात मोदींनी आता चर्चेची वेळ संपली असून आता जागतिक जनचळवळ सुरू करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. मोदींच्या भाषणावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हजेरी लावली होती.

ग्रेटानं याआधीही संयुक्त राष्ट्रसंघासमोर भाषण दिलं होतं. तिथं तिनं जगातील नेत्यांना 'बेजबाबदार मुलं' असं संबोधलं होतं. ती एवढ्यावरच थांबली नव्हती तर त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये दावोस संमेलनात उद्योग जगतातील मान्यवरांनाही जोराची चपराक लगावली होती. काही लोक आणि कंपन्यांना माहिती आहे की बक्कळ पैसा कमावण्यासाठी ते पर्यावरणातील अमुल्य गोष्टी संपवत आहेत. तुमच्यातील काही लोक त्यापैकीच एक आहात असंही तिनं सुनावलं होतं. तिचं नाव ग्रेटा टुनबर्ग, स्वीडनच्या या शाळकरी मुलीनं पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक आंदोलन उभा केलं.

एका पत्रकाराने ग्रेटाला विचारलं होतं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी तु चर्चा करशील का? त्यावर ती म्हणाली की, ते माझं म्हणणं आजिबात ऐकून घेणार नसतील तर मी माझा वेळ वाया का घालवू? त्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन संसदेच्या बैठकीवेळीही ती म्हणाली होती की, तुमचे कौतुकाचे शब्द राखून ठेवा. त्याची आम्हाला गरज नाही. प्रत्यक्षात काही करण्याआधी फक्त आम्हाला हे सांगण्यासाठी बोलावू नका की आम्ही किती प्रेरणादायी आहोत.

ग्रेटाच्या या वक्तव्यांमागे, भूमिकेमागं एक मोठा प्रश्न आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांचा प्रश्न. सध्या सुरु असलेल्या पर्यावरणाच्या हानीचा भविष्यात होणाऱ्या परिणामांविरुद्ध तिनं लढा सुरू केला आहे. त्यासाठी 20 सप्टेंबरला जगभरात लाखो मुलं शाळेत हजर न राहता पर्यावरणाची सुरक्षा करा असं म्हणत आंदोलनात सहभागी झाली होती.. वातावरणात होत असलेला बदल आणि ढिम्म बसलेल्या सरकारच्या निष्काळजीपणाविरुद्ध आंदोलन उभा केलं. तापमान वाढ आणि पर्यावरण सुरक्षेसाठी केलं जाणारं हे जगातील सर्वात मोठं आंदोलन आहे. जगातील जवळपास 150 देशांमध्ये अडीच हजारहून अधिक आंदोलने झाली. यात लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

Published by: Suraj Yadav
First published: September 24, 2019, 10:43 AM IST
Tags: UNICEF

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading