15 वर्षीय ग्रेटाचा लढा! लाखो विद्यार्थ्यांची शाळेला दांडी, जगभरातून पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार का असं पत्रकाराने विचारताच ती म्हणाली होती की, मी वेळ वाया का घालवू. आमचं कौतुक करण्यासाठी बोलवू नका.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 12:06 PM IST

15 वर्षीय ग्रेटाचा लढा! लाखो विद्यार्थ्यांची शाळेला दांडी, जगभरातून पाठिंबा

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका 15 वर्षीय मुलीनं संयुक्त राष्ट्रसंघासमोर भाषण दिलं होतं. तिथं तिनं जगातील नेत्यांना 'बेजबाबदार मुलं' असं संबोधलं होतं. ती एवढ्यावरच थांबली नाही तर त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये दावोस संमेलनात उद्योग जगतातील मान्यवरांनाही जोराची चपराक लगावली होती. काही लोक आणि कंपन्यांना माहिती आहे की बक्कळ पैसा कमावण्यासाठी ते पर्यावरणातील अमुल्य गोष्टी संपवत आहेत. तुमच्यातील काही लोक त्यापैकीच एक आहात असंही तिनं सुनावलं होतं. तिचं नाव ग्रेटा टुनबर्ग, स्वीडनच्या या शाळकरी मुलीनं पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक आंदोलन उभा केलं.

एका पत्रकाराने ग्रेटाला विचारलं होतं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी तु चर्चा करशील का? त्यावर ती म्हणाली की, ते माझं म्हणणं आजिबात ऐकून घेणार नसतील तर मी माझा वेळ वाया का घालवू? त्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन संसदेच्या बैठकीवेळीही ती म्हणाली होती की, तुमचे कौतुकाचे शब्द राखून ठेवा. त्याची आम्हाला गरज नाही. प्रत्यक्षात काही करण्याआधी फक्त आम्हाला हे सांगण्यासाठी बोलावू नका की आम्ही किती प्रेरणादायी आहोत.

ग्रेटाच्या या वक्तव्यांमागे, भूमिकेमागं एक मोठा प्रश्न आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला सामोरं जावं लागणाऱ्या समस्यांचा. सध्या सुरु असलेल्या पर्यावरणाच्या हानीचा भविष्यात होणाऱ्या परिणामांविरुद्ध तिनं लढा सुरू केला आहे. त्यासाठी आज 20 सप्टेंबरला जगभरात लाखो मुलं शाळेत हजर राहणार नाहीत. त्याऐवजी पर्यावरणाची सुरक्षा करा असं म्हणत आंदोलनात सहभागी होणार आहेत. वातावरणात होत असलेला बदल आणि ढिम्म बसलेल्या सरकारच्या निष्काळजीपणाला ते विरोध करणार आहेत. 23 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाचे जलवायू संमेलन होणार आहे. याआधी विद्यार्थी आणि तरुण संदेश देऊ इच्छित आहेत.

तापमान वाढ आणि पर्यावरण सुरक्षेसाठी केलं जाणारं हे जगातील सर्वात मोठं आंदोलन आहे. जगातील जवळपास 150 देशांमध्ये अडीच हजारहून अधिक आंदोलने होणार आहे. यात लाखो विद्यार्थी भाग घेणार आहे. भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकात्यासह 13 शहरात हे आंदोलन होतं आहे. फक्त विद्यार्थ्यांपुरतं हे आंदोलन मर्यादित नाही. अनेक संस्थांनीही याला पाठिंबा दिला आहे.

Loading...

संयुक्त राष्ट्रसंघाची 23 सप्टेंबरला एक परिषद होणार आहे. यात अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी असतील . यामध्ये पॅरिस जलवायू करार आणि त्याची उद्दिष्टं साध्य करण्यावर चर्चा करण्यात येईल. या करारात जगातील अनेक देशांमध्ये कार्बन उत्सर्जन करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं हे आंदोलन महत्वाचं ठरणार आहे.

ग्रेटानं फक्त आंदोलन सुरू केलं नाही तर स्वत:देखील पर्यावरणाची तितकीच काळजी घेतली आहे. तिने पहिल्यांदा 2018 मध्ये वातावरण बदलाविरुद्ध आंदोलन केलं होतं. शाळेत न जाता स्वीडिस संसदेच्या समोर जाऊन विरोध केला होता. त्यानंतर वर्षभर तिने दर शुक्रवारी शाळेला न जाता आंदोलन केलं. ग्रेटाच्या या आंदोलनाला Fridays For The Future असं नाव देण्यात आलं. फक्त स्वीडनपुरतं मर्यादित न राहता हे आंदोलन जगभरात पोहचलं आहे.

'भाई पण नाही छोटाही अन् मोठाही नाही', कोल्हेंची सांगितला मोदींच्या भाषणाचा मतितार्थ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...