श्रीनगर, 17 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बारामुल्ला (Baramulla) येथील पल्हालन पट्टणमध्ये ग्रेनेड हल्ला (Grenade attack) झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात CRPF चे 2 जवान जखमी झालेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पल्हालन चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ज्या हल्ल्यात दोन CRPF निमलष्करी जवान आणि एक नागरिक जखमी झाले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दहशतवाद्यांनी CRPF च्या टीमवर ग्रेनेड फेकले. या घटनेत CRPF चे दोन जवान आणि एका नागरिकाला गोळी लागली.
हेही वाचा- 117 वेळा मिळालं Challan, एकदाही भरले नाही पैसे; पोलिसांनी घेतली मोठी Action
या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान दुसरीकडे, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर समर्थित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. कमाल कोट उरी भागात जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर गोळीबार केला. सैन्यानं सर्च ऑपरेशन शुरु केलं आहे. अपडेट सुरू आहे.
Indian Army troops in the Uri sector have foiled an infiltration bid by Pakistan Army-backed terrorists. The firing took place after suspicious movement was noticed by troops in the area. Search operations have been launched by the forces. Details awaited: Army sources
— ANI (@ANI) November 17, 2021
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा सुरूच आहे. अलीकडेच, श्रीनगरच्या हैदरपोरा भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीने विशिष्ट माहितीच्या आधारे हाइपरोपोरा जवळील निवासी भागाला वेढा घातला होता. येथे दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीत सैन्याच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले.
हेही वाचा- BREAKING: कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश
गुप्तचर यंत्रणांनी खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. तयार करण्यात आलेल्या 38 दहशतवाद्यांच्या यादीत 27 दहशतवादी लष्करचे असून उर्वरित 11 जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. सुरक्षा दल आता निवडकपणे त्यांचा खात्मा करण्याचा प्लान करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Terrorist attack