आजोबांना सलाम! वयाच्या 93 व्या वर्षी घेतली मास्टर्सची डिग्री, आता तयारी एमफिलची!

आजोबांना सलाम! वयाच्या 93 व्या वर्षी घेतली मास्टर्सची डिग्री, आता तयारी एमफिलची!

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरातील जबाबदारीमुळे त्यांना शिकता आलं नाही. मात्र वयाच्या 93 व्या वर्षी त्यांना खूप शिकायचं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : शिक्षणाला कोणतंही वय नसतं. आपण शेवटपर्यंत विद्यार्थी असतो असं मोठ्या यशस्वी व्यक्तींचं म्हणणं आहे. याचं एक खरं-खुरं रुप इग्नूच्या ( Indira Gandhi National Open University - IGNOU) दीक्षांत सोहळ्यात अनुभवायला मिळालं. वयाच्या 93 व्या वर्षी सीआई शिवासुब्रमण्यम यांनी आपले मास्टर्सची डिग्री पूर्ण केली. या दीक्षांत सोहळ्यातील ते सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी होते. शिवा यांनी पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये (public administration) मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. या दीक्षांत सोहळ्यात एचआरडी मंत्री रमेश पोखरियालदेखील उपस्थित होते. त्यांनी शिवा यांना 93 वर्षांचा 'तरुण' म्हणत त्यांचे कौतुक केले. 1940 मध्ये शिवा यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतरही त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे होते. मात्र आई-वडील आजारी असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही व ते नोकरीत रुजू झाले. त्यावेळी शिवा चेन्नैमध्ये राहत होते. त्यानंतर ते दिल्लीला शिफ्ट झाले. येथे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये त्यांनी क्लर्कची नोकरी मिळाली. त्यानंतर 1986 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त झाले.

अयोध्या राम मंदिराचा मुहूर्त कधी? आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार फैसला

शिक्षणाचे स्वप्न राहिले होते अपूर्ण

मात्र तोपर्यंत शिवा यांचे पदवीधर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. निवृत्तीनंतरही कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने शिक्षण घेता येत नव्हते. त्यादरम्यान शिवा यांच्या फिजियोथेरेपिस्टने इग्नूमध्ये कोर्स करणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच शिवा चमकले. त्यांनी डॉक्टरांना अभ्यासक्रमांविषयी विचारपूस करण्यास सांगितली. इग्नूमध्ये शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा नाही. यासाठी शिवा यांनी पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी शिवा म्हणाले होते, ‘मला माहित नाही हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहिल की नाही’. शिवा यांच्या नातू-नातवांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. काहींचे लग्नही झाले असून ते अमेरिकेत स्थायिक आहेत. शिवा येथे थांबणार नाही. तर त्यांना एमफिल (mphil) करण्याची इच्छा आहे. याबाबत त्यांच्या मुलीने सांगितले की, ‘एमफीलमध्ये खूप कमी जागा असतात. अशापरिस्थिती ते अन्य कोणाची तरी सीट कमी करतील’. त्यामुळे सध्या ते कमी कालावधी पूर्ण होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या शोधात आहेत.

First published: February 19, 2020, 8:51 AM IST

ताज्या बातम्या