Home /News /national /

सलाम! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी 450 किमी पायी प्रवास, पाय सुजले तरी थांबला नाही जवान

सलाम! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी 450 किमी पायी प्रवास, पाय सुजले तरी थांबला नाही जवान

प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी जवानाला उपाशी राहावे लागले, मात्र मनात देशभक्ती असेल तर काहीही अशक्य नाही

    भोपाळ, 29 मार्च : जेव्हा देशभक्ती आणि जनसेवेचं व्रत हाती घेतलंलं असतं तेव्हा कोणतंही संकट अडवू शकत नाही. वेळेप्रसंगी जीवाची बाजी लावणारे जवान पाहिले तर अंगावर काटा उभा राहतो. राजगढ जिल्ह्यातील पचोर ठाणे क्षेत्रातील पोलीस (Police) कॉन्स्टेबल दिग्विजय शर्मा काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेले होते. जेव्हा त्यांना कळालं की कोरोना (Coronavirus) व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे, तेव्हा वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ते घरातून पायीच ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले. त्यांनी तब्बल 450 किमी अंतर पायी पार केले आणि पचोर ठाणे क्षेत्रातील आपल्या ड्यूटीवर तैनात झाले. त्यांचे कामाप्रती प्रेम व देशभक्ती पाहून संपूर्ण मध्य प्रदेशातील पोलिसांनी सलाम केला आहे. संबंधित - चीनमधील हुबेईत हिंसाचार, लॉकडाऊन हटवल्यानंतर शहर सोडण्यासाठी नागरिकांची झुंबड पायी प्रवासदरम्यान उपाशीही राहावं लागलं पचोर ठाण्याचे पदस्य कॉन्स्टेबल दिग्विजय शर्मा 16 मार्च रोजी कामासंदर्भातील परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आपल्या गावी इटावा येथे गेले होते. सुट्टीदरम्यान लॉकडाऊन झाल्याने त्यांनी परीक्षा स्थगित झाल्याकारणाने त्यांना ड्यूटीवर जायचं होतं. मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांच्याकडे कोणतेच माध्यम नव्हतं. लॉकडाऊनमुळे त्यांना कित्येत किलोमीटर अंतर पायी पार करावे लागले, काही वेळा त्यांना लिफ्टही मिळाली. लॉकडाऊन असल्याकारणाने रस्त्यात जेवणाची व्यवस्था नसल्याने अनेकदा त्यांना उपाशी राहावे लागले. मात्र ते हरले नाहीत. आणि 28 मार्च रोजी राजगडाच पोहोचले. दिग्विजय शर्मा यांनी सांगितले की त्यांना ड्यूटीवर 24 मार्चला पोहोचायचे होते.  मात्र काही पर्याय नसल्याने ते पायी जात होते. संबंधित - ‘हॅलो, मी कोरौनातून बोलतोय’ ऐकल्यावर नातेवाईकही फोन उचलेनात, ग्रामस्थांची व्यथा पाय सूजले होते 450 किलोमीटर पायी चालल्याने दिग्विजय यांच्या पायाला सूज आली होती. मात्र तरीही अशा परिस्थितीत ते आपल्या कर्तव्यापासून हटले नाहीत. पोहोचल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना परिस्थिती सांगितली. यावर सर्वांनीच त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या