नोएडा, 08 नोव्हेंबर : एका सेल्फीसाठी लोकं काहीही करतात, परिणामी सेल्फीसाठी केलेले स्टंट जीवावर बेततात. असाच प्रकार नुकताच ग्रेटर नोएडामध्ये घडला. भरलेल्या पिस्तुलासोबत सेल्फी काढणं युवकाला भारी पडलं. सेल्फीच्या नादात अचानक त्याच्या हातून पिस्तुलाचा ट्रीगर दाबला गेला आणि गोळी त्याच्या शरीरात घुसली.
या युवकाला त्याच्या मित्रांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या पोलीस मृत युवकाच्या मित्रांची चौकशी करत आहेत आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. त्यासोबतच या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेत वापरलेली पिस्तूल आणि कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
वाचा-पतीला सोशल मीडियावर दिसला पत्नीचा प्रियकरासोबतचा Nude Video; संतापाच्या भरात...
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव सौरभ मावी असून तो ग्रेटर नोएडामधील बदलापूरचा रहिवासी होता. सौरव हा मित्र नकुला उर्फ नंदू शर्मा याच्यासोबत दुसरा मित्र सचिनकडे गेला होता. गाडीत असताना अचानक सौरभ पिस्तुलाशी खेळू लागला. त्यानं मोबाइल काढून पिस्तुलासोबत फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याला वाटचे पिस्तुलात गोळी नाही आहे. त्यामुळे त्यानं ट्रीगर दाबला आणि त्याला गोळी लागली.
वाचा-सोनसाखळी चोरट्याला पकडलं, एकनाथ खडसेंच्या दौऱ्यात केला होता हात साफ
डीसीपी नोएडा सेंट्रल हरिश्चंद्र यांनी सांगितले की सौरभचा मित्र नंदूने ही माहिती बिसारख पोलिस स्टेशनला दिली. त्याचबरोबर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांनी नंदूला ताब्यात घेतले आहे. आता पोलास त्याची विचारपूस करत आहेत आणि त्याचे निवेदन पडताळत आहेत, कारण नंदू घटनेचा साक्षीदार आहे. याशिवाय सौरभला ज्या पिस्तूलमधून गोळी लागली ती लायसन्स आहे की नाही याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.