रात्रभर भटकूनही नाही झाले नवजात बाळावर उपचार, अखेर वडिलांच्या कुशीतच सोडला तान्हुल्यानं जीव

रात्रभर भटकूनही नाही झाले नवजात बाळावर उपचार, अखेर वडिलांच्या कुशीतच सोडला तान्हुल्यानं जीव

एका वडिलांनी आपल्या नवजात बालकाच्या उपचारांसाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये भटकंती केली. पण या बाळावर कुठेही उपचार होऊ शकले नाहीत.

  • Share this:

ग्रेटर नोएडा, 29 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांव्यक्तिरिक्त इतरांचे हाल होत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तप प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये घडला. एका वडिलांनी आपल्या नवजात बालकाच्या उपचारांसाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये भटकंती केली, पण या बाळावर कुठेही उपचार होऊ शकले नाहीत. उपचाराअभावी या बाळाचा वडिलांच्या कुशीतच मृत्यू झाला. अखेर या मुलाच्या वडिलांनी सोशल मीडियाचा आधार घेत याप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळं आता आरोग्य विभागाच्या चौकशीसाठी दोन जणांची समिती गठीत केल्याची माहिती मिळाली आहे.

नवजात बालकाच्या वडिलांचं नाव राजकुमार असून ते एका खासगी कारखान्यात काम करतात. त्यांच्या पत्नीनं काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयात मुलाला जन्म दिला. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, या नवजात बालकाच्या वडिलांनी सांगितले की रात्री दहाच्या सुमारास बाळाची तब्येत अधिकच खालावली. त्यानंतर, हॉस्पिटलमधील लोक म्हणाले की व्हेंटिलेटरची सुविधा नाही. यानंतर बाळाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्याकडून जास्त पैशांची मागणी केली. म्हणून नवजात बालकाच्या वडिलांनी बाळाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णवाहिकाही बराच वेळानंतर तेथे पोहचली.

वाचा-परदेशातून परतली गर्भवती, हॉस्पिटलमध्ये प्रवेश न दिल्यामुळे गर्भातच दगावलं बाळ

दरम्यान, दादरीच्या या सरकारी रुग्णालयात लहान मुलांचे डॉक्टर उपस्थित नव्हते. वृत्तानुसार, तिथे जे काही डॉक्टर उपस्थित होते, ते विश्रांती घेत होते. अशीच परिस्थिती बादलपूर आरोग्य केंद्रात दिसून आली. पहाटे 5च्या सुमारास या नवजात मुलासह रुग्णवाहिका नोएडाच्या शासकीय रुग्णालयात पोहोचली. तोपर्यंत या मुलाचा मृत्यू झाला होता.

वाचा-लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं...

आरोग्य विभागाच्या या सर्व प्रकारामुळं एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. यानंतर नवजात बालकाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित न्यायाची मागणी केली. त्यानंतर आता आरोग्य विभागाच्या त्या दिवशी उपस्थित डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे.

वाचा-कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण...

First published: May 29, 2020, 2:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या