भारताला मोठं यश; जम्मू-काश्मीरमधील लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

भारताला मोठं यश; जम्मू-काश्मीरमधील लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा

यानंतर आता श्रीनगरमध्ये दहशतवादी संघटनेचा कोणताही सदस्य शिल्लक राहिला नाही

  • Share this:

काश्मीर, 26 जुलै : जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की शनिवारी सिक्युरिटी फोर्सने लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी इश्फाक रशीद खान याचा खात्मा केला. पोलीस पुढे असंही म्हणाले की दहशतवादी इश्फाकच्या मृत्यूनंतर श्रीनगरमध्ये आता कोणत्याही ग्रुपचा दहशतवादी शिल्लक नाही.

आयजी कश्मीर विजय कुमार यांनी ट्विट करुन सांगितले की आता श्रीनगरमधील कोणताही व्यक्ती दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय नाही. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधात भारतीय सेना ऑपरेशन चालवत आहे. ज्यामध्ये 138 हून जास्त दहशतवाद्यांना मारण्यात आलं. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की शनिवारी भारतीय सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर रनबीरगढमध्ये जाण्याचा निश्चय घेतला.

हे वाचा-हिंदूस्तानात आणल्याबद्दल निदान सिंह यांनी मानले आभार; तालिबानींनी केलं होत अपहरण

येथे मोठे दहशतवादी योजना बनवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सूचनेच्या आधारावर सेनेतील स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफची एक टीम तयार केली आणि संपूर्ण भागात घेराव घातला. जेव्हा सर्व घरांचाव तपास पूर्ण झाला त्याचवेळी एका घरातून फायरिंग सुरू झाली. भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र दहशतवादी फायरिंग करीत होते. शेवटी भारतीय सुरक्षा दलाने गोळी चालविण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 2 दहशतवादी मारण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 26, 2020, 8:35 PM IST

ताज्या बातम्या