Home /News /national /

राम मंदिरासाठी 'या' राज्यातील जनतेचं मोठं योगदान; तब्बल 500 कोटी जमवला निधी

राम मंदिरासाठी 'या' राज्यातील जनतेचं मोठं योगदान; तब्बल 500 कोटी जमवला निधी

या राज्यातील जनतेनं राम मंदिरासाठी मोठा वाटा उचलला आहे

    जयपुर, 7 मार्च :  अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी (Ram Mandir) देशभरातून निधी संकलन करण्यात आलं. अगदी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत नागरिकांनी राम मंदिरासाठी दान दिलं आहे. मात्र यात एका राज्याने सर्वाधिक दान दिल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत सर्व राज्यांपैकी राजस्थानने राम मंदिर उभारणीसाठी 500 कोटी रुपयांचं दान दिलं आहे. (Great contribution of the people of rajasthan for Ram temple Funds raised by Rs 500 crore) संग्रहित संपूर्ण दानाची मोजणी होणं अद्याप बाकी आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय जयपुरला आले आणि मीडियाला सांगितलं की, देशभरात 9 लाख कार्यकर्त्यांनी 10 कोटी लोकांपर्यंत पोहोचून निधी जमा केला आहे. राजस्थानमध्ये 36 हजार गाव आणि अन्य शहरी भागांचा समावेश आहे. देशभरातील 4 लाख गावांमध्ये याबाबत जनजागृती पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. अद्याप अनेक कुटुंबाचा निधी येणं बाकी आहे. अभियानाचे स्वयंसेवक 1.75 लाख गटात जोडलेल्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन 38125 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निधी बँकेत जमा केली आहे. हैद्राबादमधील एका कंपनीकडून तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून बँक आणि न्यासामध्ये एक मजबुत सेतूच्या रुपात काम केलं. (Great contribution of the people of rajasthan for Ram temple Funds raised by Rs 500 crore) हे ही वाचा-या' नात्यावरील आरोप महाराष्ट्राने काढला खोडून; चक्क सासूने केले सुनेचे कन्यादान काँग्रेस समर्थकांनीही दिलं दान राम मंदिर निर्माणासाठी रॉबर्ट वाड्रासह अनेक लोकांनी दान देणार नसल्याच्या प्रश्नावर चंपतराय म्हणाले की, कोणावरही दबाव नाही. मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ लोकांनी फोन करुन घरी बोलावलं व दान दिलं आहे. तर ते पुढे म्हणाले की, परदेशांतून आम्ही कधी पैसे घेतले नाही. मात्र तेथे राहणाऱ्या भारतीयांनी राम मंदिरासाठी निधी जमा केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ayodhya ram mandir, Rajasthan

    पुढील बातम्या