Home /News /national /

कोरोनाविरोधातील लढाईत रेल्वेची मोठी कामगिरी, प्रवाशांसाठी बंद असूनही असं दिलं योगदान!

कोरोनाविरोधातील लढाईत रेल्वेची मोठी कामगिरी, प्रवाशांसाठी बंद असूनही असं दिलं योगदान!

रेल्वेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली. मात्र अशा स्थितीतही कोरोनाविरोधातील या लढाईत रेल्वे मागे राहिलेली नाही.

    मुंबई, 24 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे युद्धकाळातही न थांबणाऱ्या भारतीय रेल्वेला ब्रेक लागला. रेल्वेद्वारे होणारी प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली. मात्र अशा स्थितीतही कोरोनाविरोधातील या लढाईत रेल्वे मागे राहिलेली नाही. मागील एका महिन्यात मध्य रेल्वेने 1 हजार 415 रॅक्स (मालगाड्या) मध्ये 70 हजार 374 वॅगन माल वाहतूक केली. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग/ अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर सुमारे 75 रॅक (मालगाड्या) हाताळले जात आहेत. ज्यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे. सतत कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचार्‍यांनी 23 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत 1 हजार 415 रॅकमध्ये आवश्यक वस्तूंच्या 70 हजार 374 वॅगन लोड करणे शक्य केले आहे. हेही वाचा- धक्कादायक! हॉटस्पॉट मुंबईतून महिला थेट अहमदनगरमध्ये दाखल, नागरिकांनी विरोध केल्यानंतर... मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात 252 वॅगनमध्ये धान्य, 884 वॅगनमध्ये साखर, 34 हजार 497 वॅगनमध्ये कोळसा, 25 हजार 380 वॅगन्समध्ये कंटेनर, 5 हजार 183 वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, 1 हजार 802 वॅगनमध्ये खते, 635 वॅगन्समध्ये स्टील, 252 वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि 117 वॅगनमध्ये सिमेंट व 1 हजार 772 वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या. याचबरोबर सुमारे 220 पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालवल्या जात असून त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात नेल्या/पाठवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने 21 एप्रिलपर्यंत 2 हजार टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, ज्यूट बियाणे, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Indian railway

    पुढील बातम्या