Home /News /national /

पत्नीला म्हणाला, 5 मिनिटात घरी येईन; सकाळी पतीचा आढळला मृतदेह

पत्नीला म्हणाला, 5 मिनिटात घरी येईन; सकाळी पतीचा आढळला मृतदेह

घरी फोन केला होता तेव्हा 5 मिनिटात पोहचेन असं सांगितलं होतं. पण त्यानंतर अर्धा पाऊण तास झाल्यानंतरही घरी न आल्याने पत्नीसह कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी : ग्रेटर नोएडा वेस्ट इथं मंगळवारी सकाळी एक मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. गौर चौकातील क्रिकेट ग्राउंडच्या जवळ मृतदेह सापडला. मृताची ओळख पटली असून गौरव चंदेल असे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, चंदेलच्या कुटुंबियांनी हा खून असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबियांनी सोमवारी रात्री उशिरा गौरव बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेहच मिळाला. याबाबात मिळालेली माहिती अशी की, गौरव चंदेल गौर सिटीमध्ये राहत होता. सोमवारी रात्री गुरुग्राम ऑफिसमधून ते स्वत:च्या गाडीने गौर सिटीकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांनी एक महिना आधीच गाडी खरेदी केली होती. पृथला चौकात आल्यानंतर त्यांनी घरी फोन केला होता तेव्हा 5 मिनिटात पोहचेन असं सांगितलं होतं. पण त्यानंतर अर्धा पाऊण तास झाला तरी गौरव चंदेल घरी आले नाहीत. त्यानंतर गौरव यांच्या पत्नीने फोन केला पण तो उचलला नाही. पत्नीसह कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली मात्र ते न सापडल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. गौरवच्या घरच्यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही. पोलिस ठाण्यातून सांगण्यात आलं की सकाळी 10 नंतर फोनच्या डिटेल्सवरून काही माहिती मिळू शकेल. शेवटी घरच्या लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांचा मृतदेहच सापडला. वाचा : कधीही न विसरणारा बर्थ डे! केकच्या डिझाईनवरून झालेल्या राड्यात गमावला मित्र घटनास्थळावर त्यांची गाडी नव्हती. तसेच त्यांच्याकडे असलेला मोबाईल आणि लॅपटॉपही आसपास नव्हता. गौरव मृतावस्थेत सापडल्यानंतर अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. VIDEO : रेल्वे फाटक बंद होईल म्हणून बाईक सुसाट पळवली आणि...
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: New delhi

    पुढील बातम्या