S M L

91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी सुरू

तसंच कथालेखकांचे आयुष्य त्यांच्या कथेच्या विश्वाचा वेध घेणाराही एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर मराठी भाषा सुंदरी हा मराठीचे बहुरूपी दर्शन घडवणारा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 15, 2018 06:22 PM IST

91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची  ग्रंथदिंडी सुरू

15 फेब्रुवारी:  बडोद्यामध्ये होत असलेल्या 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीला सुरूवात झाली आहे. तर उद्या सकाळी संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होईल.

16,17,18 फेब्रुवारी असे तीन दिवस हे साहित्य संमेलन चालणार  आहे. या संमेलनाचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आहेत.  या  संमेलनाच्या तयारी वरून सध्या अंतिम हात फिरवला जात  आहे. या संमेलनात  कार्यक्रमांची  रेलचेल असणार आहे. बोलीतील कविता असं मराठीच्या वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी अशा विविध बोलीतील काव्य संमेलन होणार आहे. तर नागर ते नांगर या विषयावर एक टॉक शो घेतला जाईल. तसंच कथालेखकांचे आयुष्य त्यांच्या कथेच्या विश्वाचा वेध घेणाराही एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर मराठी भाषा सुंदरी हा मराठीचे बहुरूपी दर्शन घडवणारा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी हे संमेलन आधी बुलढाणा जिल्ह्यात होणार होतं. पण काही आक्षेपांमुळे संमेलनाची जागा बदलली गेली आणि आता हे संमेलन बडोद्यात पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close