Home /News /national /

Gram Panchayat Election: तिन्ही पत्नी उतरल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात; अडचणी वाढल्याने ग्रामसेवक पती फरार

Gram Panchayat Election: तिन्ही पत्नी उतरल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात; अडचणी वाढल्याने ग्रामसेवक पती फरार

Gram Panchayat Election: तिन्ही पत्नी उतरल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात; अडचणी वाढल्याने ग्रामसेवक पती फरार

Gram Panchayat Election: तिन्ही पत्नी उतरल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात; अडचणी वाढल्याने ग्रामसेवक पती फरार

मध्य प्रदेशात त्रिस्तरीय ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारी आणि दावेदारीबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक किस्सेही बाहेर येत आहेत.

सिंगरौली, 18 जून : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) त्रिस्तरीय ग्रामपंचायत निवडणुकांची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू होताच, अनेक विचित्र किस्से समोर येऊ लागले आहेत. सिंगरौलीत असाच एक अजब किस्सा समोर आला आहे. येथे एका व्यक्तीच्या तीन पत्नी (Wife) एकाचवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. हा पती कोणी सामान्य माणूस नसून सरकारी कर्मचारी आहे. या महिलांपैकी दोघी जणी सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत तर तिसरी पत्नी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा प्रकार सिंगरौली जिल्ह्यातल्या देवसर पंचायत समिती गणात येणाऱ्या पिपरखाड ग्रामपंचायतीत घडला आहे. सध्या ही व्यक्ती सरकारी नोकरी आणि पत्नींचा दबाव यामुळे गावातून फरार झाली आहे. मध्य प्रदेशात त्रिस्तरीय ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारी आणि दावेदारीबाबत चर्चा सुरू आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक किस्सेही बाहेर येत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात कुठे सासू आणि सून एकमेकांच्या विरोधात तर कुठे जावा-जावा आमने-सामने उभ्या आहेत; पण सिंगरौलीच्या पिपरखाड ग्रामपंचायत निवडणुकीतला किस्सा काहीसा वेगळा आहे. कटहदा येथील ग्रामसेवक (Gram Panchayat Secretary) सुखराम गौड यांच्या तीन पत्नी पिपरखाड ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात आहेत. सुखराम यांची पहिली पत्नी कुसुम कली सिंह आणि दुसरी पत्नी गीता सिंह या एकाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या दावेदार आहेत. तिसरी पत्नी उर्मिला सिंह या देवसर येथील प्रभाग क्रमांक 13 मधून सदस्यपदासाठी उमेदवार आहेत. हेही वाचा - Love Marriage करून नशीब फळफळलं; 21 वर्षांची जानकी बिनविरोध झाली सरपंच! सुखराम गौड यांच्या अडचणी वाढल्या हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर सुखराम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आधिकाऱ्यांनी या ग्रामसेवकाला कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच याप्रकरणी सुखराम यांनी तातडीनं खुलासा करावा, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. हिंदू विवाह कायद्यानुसार एक पत्नी हयात असताना संबंधित व्यक्ती दुसरं लग्न करू शकत नाही; पण सुखराम यांनी चक्क तीन विवाह (Marriage) केले आहेत. अशा स्थितीत तपास योग्य पद्धतीनं झाला तर ग्रामपंचायत सचिवाची सरकारी नोकरी तर जाईलच, शिवाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. पतीनं सोडलं गाव या प्रकारानंतर ग्रामसेवक सुखराम गाव सोडून अज्ञातस्थळी निघून गेले आहेत. सुखराम यांनी 30 वर्षांपूर्वी कुसुम कलीसोबत पहिलं लग्न केलं. त्यानंतर 10 वर्षांपूर्वी गीता सोबत दुसरं तर 2 वर्षांपूर्वी उर्मिला सोबत तिसरं लग्न केलं. या व्यक्तीच्या तिन्ही पत्नी गावातच राहतात. परंतु, त्या वेगवेगळ्या घरात राहतात. आता हे प्रकरण चांगलंच तापलं असून ग्रामस्थ उघडपणे या प्रकरणाची चर्चा करत आहेत.  
First published:

Tags: Election

पुढील बातम्या