एक देश, एक रेशन कार्ड; काय आहे केंद्र सरकाची योजना?

केंद्र सरकार एक देश, एक रेशन कार्ड या योजनेवर गांभीर्यानं विचार करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 12:38 PM IST

एक देश, एक रेशन कार्ड; काय आहे केंद्र सरकाची योजना?

नवी दिल्ली, 29 जून : कामानिमित्त अनेक जण आपल्या मुळ गावापासून, शहरापासून दुसरीकडे वास्तव्य करतात. अशावेळी त्यांना रेशन कार्ड देखील नवीन तयार करून घ्यावं लागतं. शिवाय, सरकारच्या नव्या नियमानुसार एक नाव दोन ठिकाणी देखील ठेवता येत आहे. काहींना तर कामामुळे इतरत्र वास्तव्य केल्यानं रेशन दुकानावरील धान्याला मुकावं लागते. गरिबांना याचा मोठ्या प्रमाणावर फटक बसतो. त्यामुळे आता केंद्र सरकार ‘एक देश, एक रेशनकार्ड’बाबत गांभीर्यानं विचार करत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेतंर्गत देशातील कोणत्याही ठिकाणी धान्य घेणं शक्य होणार आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली. लवकरच ही योजना अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी? काय आहेत काँग्रेस समोरील पर्याय

गरिबी हटवण्याचं लक्ष

संयुक्त राष्ट्र संघानं देशातून 2030 पर्यंत गरिबी नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सध्या रेशनवर 2 रूपये किलो दरानं गहू आणि 3 रूपये किलो दरानं तांदुळ मिळत आहेत. याचा फायदा हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. पण, अनेकांना गाव, शहराबाहेर असल्यानं याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेतंर्गत सर्वांना याचा लाभ मिळेल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

VIDEO: घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, कारचं मोठं नुकसान

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...