यावर्षी देशात अन्नधान्याचं बंपर उत्पादन

उत्पादन 227.5 दशलक्ष टनांवर पोचण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 25 लाख टनांची वाढ होऊ शकते.गहू उत्पादनात मात्र घट होण्याची चिन्हं आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 28, 2018 07:45 PM IST

यावर्षी देशात अन्नधान्याचं बंपर उत्पादन

28 फेब्रुवारी: देशाचं अन्नधान्य उत्पादन 227.5 दशलक्ष टनांवर पोचण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 25 लाख टनांची वाढ होऊ शकते.गहू उत्पादनात मात्र घट होण्याची चिन्हं आहेत.

यंदा देशाचं अन्नधान्य उत्पादन 2 हजार 275 लाख टन इतकं विक्रमी होण्याची अपेक्षा केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवली आहे. मंत्रालयातल्या सुत्रांच्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या धान्य उत्पादनाच्या तुलनेत यंदा धान्य उत्पादनात जवळपास 25 लाख टनांची वाढ होणं अपेक्षित आहे. यंदा तांदळाचे, कडधान्यांचे, भरडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याचवेळी गहू, कापूस, तेलबियांच्या उत्पादनात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसतंय. तर साखरेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत अंदाजे 15 टक्क्यांची विक्रमी वाढ होऊ शकते.

देशाच्या गहू उत्पादनात 1.42 % घट, राजस्थानात क्षेत्र घटल्याचा परिणाम

देशात खाद्यान्नाचं उत्पादन नवे विक्रम तयार करत असताना कमी पाऊस आणि जास्त मोठ्या क्षेत्रातले शेतकरी कडधान्यांच्या पिकाकडं वळाल्यानं गव्हाचं उत्पादन जवळपास दीड टक्क्यांनी घटणार असल्याचं स्पष्ट झालंय. राजस्थान या आघाडीच्या गहू उत्पादक राज्यातले शेतकरी कमी पाण्यात येणाऱ्या कडधान्य पिकांकडं वळाल्यानं गव्हाचं क्षेत्र आणि पर्यायानं उत्पादनही घटल्याची माहिती पुढं येतेय. या भागात झालेला कमी पाऊस यामागचं प्रमुख कारण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2018 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close