VIDEO : 'नेता होण्यासाठी एसपी-कलेक्टरची कॉलर पकडा', मंत्र्याचा भावी पिढीला अजब सल्ला

VIDEO : 'नेता होण्यासाठी एसपी-कलेक्टरची कॉलर पकडा', मंत्र्याचा भावी पिढीला अजब सल्ला

देशाचं भविष्य म्हणून ज्या मुलांकडे पाहिलं जातं त्यांना या मंत्री महोदयांनी दिलेले धडे बघितलेत तर चिड आल्याशिवाय राहणार नाही.

  • Share this:

रायपूर, 10 सप्टेंबर : नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि त्याचे व्हायरल होणारे व्हिडिओ हे काही नवीन नाही. अनेकदा बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतो याचं भानच नेत्यांना राहत नाही. आता छत्तीसगढच्या एका मंत्री महोदयांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशाचं भविष्य म्हणून ज्या मुलांकडे पाहिलं जातं त्यांना या मंत्री महोदयांनी दिलेले धडे बघितलेत तर चिड आल्याशिवाय राहणार नाही. छत्तीसगढच्या भूपेश बघेल सरकारमध्ये मंत्री असलेल्या कवासी लखमा यांचा हा व्हिडिओ शिक्षक दिनाच्या एका कार्यक्रमातला असल्याचं म्हटलं जातं आहे.

व्हिडिओमध्ये मंत्री लखमा यांनी म्हटलं की, एसपी आणि कलेक्टरची कॉलर पकडलीत तर मोठा नेता व्हाल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मंत्री लखमा शाळेच्या मुलांसोबत बसले असल्याचं दिसत आहे.

लखमा यांनी मुलांना एक प्रसंग सांगितला. त्यात ते म्हणतात की, मुख्यमंत्री आणि पुनिया यांच्या उपस्थितीत एका मुलाला मी विचारलं की तुला काय व्हायचं आहे. तेव्हा त्यानं सांगितलं की नेता व्हायचं आहे. उत्तर सांगताच मुलानं उलट प्रश्न विचारला, की तुम्ही मोठे नेते कसं झालात. मला काय करावं लागेल?

मुलानं विचारलेल्या प्रश्नावर मी सांगितलं की, कलेक्टर किंवा एसपीची कॉलर पकड, नेता होशील असं लखमा म्हणत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. चार दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Published by: Suraj Yadav
First published: September 10, 2019, 2:19 PM IST
Tags: india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading