बचत खात्यातील जमा पैशांबद्दल मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

बचत खात्यातील जमा पैशांबद्दल मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत

मोदी सरकारने जर हे विधेयक मंजूर केलं तर याचा फायदा लोकांसोबत बँकांनाही होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (Punjab & Maharashtra Co Operative Bank) बँक आणि इतर सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती पाहात मोदी सरकारने (Government of India) बँकेतील बचत खात्यावर मिळणाऱ्या सुरक्षेची मर्यादा वाढवण्याच्या विचारात आहे. याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तसे संकेत दिले आहे.

निर्मला सीतारमन यांनी स्पष्ट केलं की, बचत खात्याबद्दल बँक डिपॉझिट गॅरंटी विधेयक आगामी अधिवेशनात सादर केले जाईल. बँक डिफॉल्टच्या नंतर डिपॉझिट इंश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशन (DICGC) ने घालून दिलेल्या नियमांनुसार, बँकेच्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंत सुरक्षेची खात्री देण्यात आली आहे.

काय आहे DICGC नियम

- DICGC म्हणजे डिपॉझिट इंश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉरपोरेशनच्या नियमानुसार सर्व बँकांना ग्राहकांना 1 लाखांची सुरक्षा द्यावी लागते.

- यामध्ये मुद्दल आणि व्याज (Principal and Interest) दोघांचा समावेश केला आहे. म्हणजे, जर दोन्ही मिळून जर रक्कम ही 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयेच सुरक्षित मानले जातील.

- आणखी सोप करून सांगायचं झालं तर, जर एखाद्या बँकेत तुमचे 4 लाख रूपये बचत खात्यात जमा आहे. त्यावर तुम्हाला फक्त 1 लाख रुपयांची सुरक्षा हमी दिली जाते. उर्वरीत रक्कम तुम्हाला मिळेल की नाही याची कोणतीही खात्री नाही.

आता काय होऊ शकतं?

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार बँकेत जमा केलेल्या पैशांवर सुरक्षेची 1 लाख रुपयाची मर्यादा ही वाढवून 3 लाख करण्यात येईल. येत्या अधिवेशनात यासंबंध विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे.

सुरक्षेची रक्कम वाढवण्याचा बँकांनाच फायदा

मोदी सरकारने जर हे विधेयक मंजूर केलं तर याचा फायदा लोकांसोबत बँकांनाही होईल. बँकेत ग्राहकांच्या बचत खात्यातील रक्कमेवर सुरक्षा वाढली पाहिजे. याबद्दल अर्थ मंत्रालयामध्ये चर्चा झाली आहे, लवकरच याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.

जर हा निर्णय झाला तर सरकारलाही याचे अनेक फायदे होणार असल्याचं कळतंय. लोकांना बँकेत पैसे जमा करण्यात सुरक्षितता वाटेल. त्यामुळे बँकेत जास्त रक्कम जमा होईल आणि जास्त कर्जही देता येईल.

=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या