Elec-widget

कांदा पुन्हा एकदा रडवणार; केंद्राने निर्यातीवर घातली बंदी

कांदा पुन्हा एकदा रडवणार; केंद्राने निर्यातीवर घातली बंदी

कांद्याच्या निर्यातीवर बंदी निर्णय तात्काळ लागू केला गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: देशात यंदा कांद्याचे उत्पन्न कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. कांद्याच्या निर्यातीचा निर्णय तात्काळ लागू केला गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

का घेतला निर्णय

> यंदा देशात कांद्यांचे कमी उत्पन्न

> गेल्या काही दिवासांपासून दर वाढत आहेत

Loading...

> वाढते दर रोखण्यासाठी निर्यातीवर बंदी

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने अनेक प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे अखेर सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. भविष्यात कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी रविवारी तातडीने हा निर्णय घेतल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

निर्यात बंदीचा निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारने इजिप्त आणि अफगाणिस्थान येथून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला होता. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही देशातून आयात होणाऱ्या कांद्याची पहिली खेप ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत येऊ शकते. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या किमतीपासून दिलासा मिळेल. इजिप्तमधून मागवण्यात आलेला कांदा 15 ऑक्टोबरपर्यंत भारतात येईल. याआधी कांद्याचे दर 2015मध्ये मोठ्या प्रमाणात वाढले होते. तेव्हा एक किलोसाठी 100 रुपये इतका दर गेला होता. यासंदर्भात रविवारी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनी सांगितले की, कांद्याच्या निर्यात धोरणात बदल केला आहे. आजपासून कांद्याच्या निर्यात बंद करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक किलो कांद्याची किमत 70 ते 80 रुपये किलो आहे.

कांद्याचे दर वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कमी उत्पन्न होय. दक्षिण आणि मध्य भारतात यंदा झालेला मुसळधार पाऊस यामुळे कांद्याचे उत्पन्न कमी झाले आहे. पावसामुळे कांद्याचे पिक खराब झाले. नाशिकमधील कांदा सर्वोत्त मानला जातो. यावेळी नाशिकमध्ये पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: onion
First Published: Sep 29, 2019 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...