नोकरी सोडणाऱ्यांवरही असेल सरकारचं लक्ष, तयार होतेय नवी सिस्टिम

नोकरी सोडणाऱ्यांवरही असेल सरकारचं लक्ष, तयार होतेय नवी सिस्टिम

सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. त्यासाठीच एक नवा प्लॅन करायचं ठरतंय.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च : सरकारी नोकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. त्यासाठीच एक नवा प्लॅन करायचं ठरतंय. या व्यवस्थेत रोजगाराचं पूर्ण चित्रच समोर येणार आहे. यात कळतं की नोकरीच्या किती संधी उपलब्ध झाल्यात. यासाठी काम सुरू झालंय.

एम्प्लाॅयीज प्राॅव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन (EPFO ) कडून प्रसिद्ध होणारा दर महिन्याच्या डेटामध्ये नोकरीतल्या नव्या संधी तर दिसतातच, पण ज्या लोकांनी एक नोकरी सोडून दुसरी पकडलीय किंवा काही दिवसांनी पुन्हा नोकरी पकडलीय त्यांची मोजदादही यात असते. पण नोकरी सोडणारे आणि पुन्हा नोकरी पकडणाऱ्यांची माहिती उशिरा मिळते. त्यामुळे ती विश्वसनीय नसते.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, पुन्हा नोकरी करणारे किती आहेत, याची मोजणी करणारी व्यवस्था फार चांगली नाही. तसे आकडे हवेत. लवकरच असे आकडे दिले जातील.

सब्सक्राइबर्सची संख्या वाढतेय कारण नोटबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतर अर्थकारणात संघटित क्षेत्राचा आकार वाढतोय. असंघटिक श्रेत्रात फाॅर्मल एम्प्लाॅयमेंटच्या रूपात रीक्लासिफिकेशनमुळेही ही संख्या वाढलीय.

ताज्या आकड्यांप्रमाणे ईपीएफओ सब्सक्राइबर्सची संख्या जानेवारीत 8, 96,000पेक्षा जास्त झालेली. 17 महिन्यांतला हा उच्चांक आहे.

देशात रोजगाराशी संबंधित रिपोर्टवरून सरकारवर टीका सुरू आहे. लीक झालेल्या ड्राफ्टनुसार 2017-18मध्ये असलेली बेरोजगारी 45 वर्षांपेक्षा जास्त होती. टीकेनंतर सरकारनं रोजगाराच्या संधींची माहिती घेण्याचा वेग वाढवला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की सरकारमध्ये काही लोकांनी दावा केलाय की ईपीएफओ आणि मुद्रा कर्जावरून रोजगारी कळू शकते. पण अधिकाऱ्यांच्या मते यात बरेच जण नसतातच.

VIDEO मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती - सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

First published: March 26, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading