03 फेब्रुवारी : ज्या मुलांना बालवाडी प्रवेश घ्यायचा आहे अशा पालकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.आता देशभरात बालवाडी प्रवेशात होणाऱ्या मनमानीला आता चाप लागणार आहे. केंद्र सरकारने पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश शालेय शिक्षणात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी विशेष नियमावली तयार करता येणे शक्य होणार आहे.
लहान मुलांच्या मुलाखती घेण्यापासून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी, अभ्यासाचे ओझे, देणगी अशा विविध प्रश्नांमुळे दरवर्षी बालवाडी प्रवेश प्रक्रिया ही चर्चेचा विषय ठरते. यासंदर्भात दाद कुठे मागायची, याबाबत कोणतीही यंत्रणा नसल्याने पालक हतबल होतात. राज्यातही पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी नियमावली तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र आता पूर्व प्राथमिक शिक्षणालाही दिशा देण्यासाठी केंद्र सरकर विशेष प्रयत्न करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Nursary, School, नर्सरी, पूर्व प्राथमिक, शालेय शिक्षण, शाळा