स्वतंत्र देशाची घोषणा करणाऱ्या ढोंगी 'बाबा'ला दणका, सरकारने घेतला मोठा निर्णय

स्वतंत्र देशाची घोषणा करणाऱ्या ढोंगी 'बाबा'ला दणका, सरकारने घेतला मोठा निर्णय

इक्वाडोरने नित्यानंदला आश्रय दिल्याचं वृत्त फेटाळून लावलंय. त्यामुळे नित्यानंद आता इक्वाडोरमधून हैतीत गेला असल्याची माहितीही देण्यात येतेय.

  • Share this:

नवी दिल्ली 06 डिसेंबर : बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप असलेला बाबा स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा वादात सापडलाय. कैलासा या स्वतंत्र देशाची निर्मिती केल्याची घोषणा त्याने केली होती, त्यामुळे तो पुन्हा एकदा वादात सापडला होता. नोव्हेंबर महिन्यात नित्यानंद हा नेपाळमार्गे विदेशात पळून गेल्याची माहितीही पुढे आलीय. यानंतर परराष्ट्रमंत्रालयाने मोठा निर्णय घेत नित्यानंदचा पासपोर्ट रद्द करण्याची घोषणा केलीय. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहिती दिली. विदेशातल्या सर्व भारतीय दुतावासांना याबाबत कळविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नित्यानंदभोवतीचा चौकशी यंत्रणांचा फास आता आवळला जाणार आहे. दक्षिण अमेरिकेतला देश असलेल्या इक्वाडोरमध्ये नित्यानंदने एक बेट घेऊन कैलासा या हिंदू राष्ट्राची स्थापना केल्याची घोषणा केली होती.

काँग्रेसचे खासदार संसदेत अंगावर धावून आले स्मृती इराणींचा गंभीर आरोप

मात्र आता इक्वाडोरने नित्यानंदला आश्रय दिल्याचं वृत्त फेटाळून लावलंय. त्याचबरोबर त्याला जमीन घेण्यासाठी सरकारने कुठलीही मदत केली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नित्यानंद आता इक्वाडोरमधून हैतीत गेला असल्याची माहितीही देण्यात येतेय. 2010मध्ये एका अभिनेत्रीसोबतचा त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला अटकही झाली होती. तसच त्याविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल झाला होता.

हैदराबाद Encounter : आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीचं का नेलं घटनास्थळी?

दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर येथे एक बेट विकत घेतल्याचे वृत्त आहे. या बेटाला नित्यानंदने नवा देश असल्याचे जाहिर केले आहे. या देशाचे नाव त्याने 'कैलासा' (Kailaasa)असे ठेवले आहे. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2018मध्ये मिळालेल्या जामीनाचा फायदा घेत तो देश सोडून पळाला होता. यासंदर्भात गुजरात पोलिसांनी देखील कोर्टाला सांगितले की नित्यानंद देश सोडून गेला आहे. त्याच्या पासपोर्ट (Passport)ची मुदत सप्टेंबर 2018मध्ये संपल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या