विजय मल्ल्यासाठी सरकारी अतिथीगृहाचं होणार कारागृहात रूपांतर

विजय मल्ल्यासाठी सरकारी अतिथीगृहाचं होणार कारागृहात रूपांतर

याआधी आर्थर रोड जेलमधील बराक नं- 12 मल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आल्याचा प्रस्ताव होता, हे बराक मल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आलंय. एसी वगळता युरोपच्या कारागृहांमध्ये ज्या सोयी असतात, त्या सर्व सोयी या बराकमध्ये असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : विजय मल्ल्यासाठी सरकारी अतिथीगृहाचे कारागृहात रूपांतर करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे.  आर्थर रोड जेलच्या स्थितीवरून मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला लंडन कोर्टाकडून नकार मिळू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मिळून नवीन प्रस्ताव तयार केला आहे.

याआधी आर्थर रोड जेलमधील बराक नं- 12 मल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आल्याचा प्रस्ताव होता, हे बराक मल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आलंय. एसी वगळता युरोपच्या कारागृहांमध्ये ज्या सोयी असतात, त्या सर्व सोयी या बराकमध्ये असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या बराकचे फोटोही प्रस्तावसोबत जोडण्यात आले होते.

याच बराकमध्ये 26/11च्या हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. लंडन कोर्टात 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. आणि कारागृहाच्या परिस्थितीच्या मुद्द्याचा फायदा मल्ल्याला मिळू नये, यासाठी सरकारनं ही पावलं उचलली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 12:49 PM IST

ताज्या बातम्या