Home /News /national /

काळी टोपी RSS ची आहे का? भगत सिंग कोश्यारींनी राहुल गांधींचे टोचले कान; म्हणाले...

काळी टोपी RSS ची आहे का? भगत सिंग कोश्यारींनी राहुल गांधींचे टोचले कान; म्हणाले...

'मी RSS चा आहे, पण माझी टोपी उत्तराखंडची आहे.'

'मी RSS चा आहे, पण माझी टोपी उत्तराखंडची आहे.'

महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काळ्या टोपीच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना खडेबोल सुनावले आहेत

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: ममहाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काळ्या टोपीच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना खडेबोल सुनावले आहेत. भगत सिंग कोश्यारी यांनी शनिवारी RSS आणि ते परिधान करत असलेल्या काळ्या रंगाच्या टोपीवरून (RSS Black Cap) घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली आहे. ते 'भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारी' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून संसदेतील आठवणींना उजाळा दिला आहे. एक घटनेची आठवण करून देताना, कोश्यारी म्हणाले की, लाल कपडा पाहिल्यानंतर बैल ज्याप्रकारे रिअॅक्ट करतो. त्याप्रमाणे माझी काळी टोपी पाहून बरेच लोक प्रतिक्रिया देत असतात. ते पुढे म्हणाले की, "राहुल गांधींनी एकेकाळी मला (भाजप खासदार असताना) विचारलं होतं की, तुम्ही काळी टोपी का घालता? मी त्यांना सांगितलं की, उत्तराखंडमधील लोकं अशाप्रकारची टोपी घालतात. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, 'नाही, नाही, तुम्ही आरएसएसचे आहात म्हणून ही टोपी घालता. यावर कोश्यारी म्हणाले की, 'मी RSS चा आहे, पण माझी टोपी उत्तराखंडची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वीपासून उत्तराखंडचे लोकं अशाप्रकारची टोपी घालतात." हेही वाचा-'हॅलो, ED ऑफिसमधून बोलतोय', करोडो रुपये उकळणाऱ्या 'गोडसे' फिल्मच्या नायकाला अटक भगत सिंग कोश्यारी यांच्या जीवनावर अधारित पुस्तकाचं प्रकाशन कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे करण्यात आलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी कुमार चौबे, कोश्यारी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू उपस्थित होते. चाणक्य वार्ता प्रकाशन समूहाने कोश्यारींनी भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात दिलेल्या भाषणांवर अधारित पुस्तक प्रकाशित केलं आहे. हेही वाचा-आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी दिसणार BH; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोश्यारींनी घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांचे रिपोर्टही या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच 450 पानांच्या या पुस्तकात कोश्यारीच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाची छायाचित्रेही संकलित करण्यात आली आहेत. हे पुस्तक चार विभागात विभागलेलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Governor bhagat singh, Rahul gandhi

    पुढील बातम्या