Home /News /national /

Corona Vaccine: फायझरच्या लशीला भारतात परवानगी मिळणे अवघड, या अटीमुळे अडलं घोडं

Corona Vaccine: फायझरच्या लशीला भारतात परवानगी मिळणे अवघड, या अटीमुळे अडलं घोडं

फायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे.

    नवी दिल्ली 06 डिसेंबर: ब्रिटिश औषध निर्माता कंपनी फायझर (Pfizer) ने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) वापराला भारतात परवानगी मागितली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने याबाबतचा अर्ज भारतीय औषधी महानियंत्रक DCGI (डीसीजीआई) कडे केला आहे. मात्र हा अर्ज करताना कंपनीने जी अट घातली त्या अटीमुळे सर्व घोडं अडलं असून त्यामुळे फायझरच्या लशीला (Pfizer corona Vaccine) परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे. फायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. भारतात अर्ज करताना कंपनीनी एक अट घातली आहे. या औषधामुळे जर एखाद्या रुग्णावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. ती जबाबदारी सरकारे घ्यावी असं कंपनीने म्हटलं आहे. या अटीमुळे फायझरला भारतात परवानगी मिळाण्याची शक्यता नसल्याचं मत व्यक्त होत आहे. औषध नियामकांकडे दाखल केलेल्या अर्जात कंपनीने भारतात आयात आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ड्रग्स अॅण्ड क्लिनिकल ट्रायल नियम 2019 च्या विशेष तरतुदीनुसार भारतातील लोकसंख्येचा विचार करता क्लिनिकल चाचण्यांमधून सूट मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला होता. कोरोनाव्हायरसविरूद्ध 95 टक्के प्रभावी असलेली फायझर कंपनी आणि बायोएनटेक एसई कंपनीच्या कोरोना लशीला यूकेमध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यापासूनच ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस synthetic mRNA वर आधारित आहे. याद्वारे मानवी शरीरात प्रोटीन तयार होतात जे नंतर संरक्षणात्मक अँटिबॉडी विकसित करतात. पुणेकर ठरला Asian Of the Year; कोरोना विरोधी कामगिरीबद्दल पुनावालांचा सन्मान अमेरिकी फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार करण्यात आलेल्या या कोरोना व्हायरस लशीला (Coronavirus Vaccine) ब्रिटनमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ब्रिटनमधील लोकांना ही लस दिली जाणार आहे. ब्रिटनमधून जगाला दिलासा देणारी बातमी आल्यानंतर काही तासांनी पुतीन यांनी रशियन सरकारला मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आदेश दिल्याने आता 2020 च्या अखेरीस जगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या