मराठी बातम्या /बातम्या /देश /LPG Subsidy! केवळ गरीबांनाच अनुदान देण्याचा मोदी सरकारचा विचार, इतरांसाठी पूर्ण किंमत

LPG Subsidy! केवळ गरीबांनाच अनुदान देण्याचा मोदी सरकारचा विचार, इतरांसाठी पूर्ण किंमत

भारतात यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी (Government thinking to give LPG subsidy only to poor section) गॅसवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

भारतात यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी (Government thinking to give LPG subsidy only to poor section) गॅसवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

भारतात यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी (Government thinking to give LPG subsidy only to poor section) गॅसवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : भारतात यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी (Government thinking to give LPG subsidy only to poor section) गॅसवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. भारतात गेल्या काही महिन्यांत एलपीजी (Growing LPG prices) गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात सरकारने सबसिडी बंद केल्यामुळे सामान्यांच्या बजेटवर त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. मात्र सरकारी तिजोरीवर (Big decision regarding LPG subsidy expected soon) होणाऱ्या परिणामांचा विचार करता, सबसिडीबाबत एक मोठा निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारपुढे दोन पर्याय

एलपीजी गॅसवरील सबसिडीबाबत सरकारपुढे सध्या दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे कुठल्याही वर्गाला कुठल्याही प्रकारची सबसिडी न देणं आणि दुसरं म्हणजे देशातील केवळ गरीबांना सबसिडी देणं आणि इतरांना बाजारभावानुसार गॅस सिलिंडर देणं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10 लाख रुपये उत्पन्नाचा निकष कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणं उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसाठी ही योजना कायम राहण्याची शक्यता आहे. इतर सर्वांसाठी मात्र सबसिडी संपुष्टात येण्याचीच दाट शक्यता आहे.

हे वाचा- वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे तुमच्याही कानावर परिणाम होतोय का? ही आहेत लक्षणं

केंद्र सरकारकडून सबसिडी बंद

देशात गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असतानादेखील सरकारनं त्यावर सबसिडी देणं बंद केलं आहे. 2020-21 साली पहिल्या चार महिन्यात सरकारनं गॅसच्या सबसिडीवर 16,461 रुपये खर्च केले होते. तर या वर्षी पहिल्या चार महिन्यांत केवळ 1233 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्या काळात गरीबांना एलपीजी सिलिंडर मोफत दिले जात होते. त्यानंतर सरकारच्या अंतर्गत सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार आता ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरसाठी 1000 रुपये खर्च करावे लागू शकतात. कोरोना काळात जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या मागणीत घट नोंदवण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात आता सबसिडीदेखील बंद झाल्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.

First published:
top videos

    Tags: Central government, LPG Price