पाकला आणखी एक झटका, केंद्रानं विकली 1,100 कोटींची ‘शत्रु संपत्ती’

पाकला आणखी एक झटका, केंद्रानं विकली 1,100 कोटींची ‘शत्रु संपत्ती’

केंद्र सरकारनं गुरुवारी विप्रो कंपनीकडे असलेली 1,100 कोटींची शत्रु संपत्ती (एनिमी शेअर) विकली आहे. ही संपत्ती केंद्रीय गृह मंत्रालयाकडं एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया अंतर्गत देखरेखीखाली ठेवण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 एप्रिल : पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्यामुळं आता आणखी एक झटका पाकिस्तानला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारनं गुरुवारी विप्रो कंपनीकडे असलेली 1,100 कोटींची शत्रु संपत्ती (एनिमी शेअर) विकली आहे. ही संपत्ती केंद्रीय गृह मंत्रालयाकडं एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया अंतर्गत देखरेखीखाली ठेवण्यात आली होती.

हे शेअर दोन पाकिस्तानी नागरिकांशी संबधित आहेत. दरम्यान, युध्दानंतर मालमत्ता कर 1968 कायद्यान्वये भारत सरकारनं ही मालमत्ता जप्त केली होती. खरतर भारतानं 1960नंतर चीन आणि पाकिस्तानसोबत झालेल्या युध्दानंतर अश्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यानंतर हे शत्रु शेअर देशातील तीन मोठ्या कंपन्यांनी विकत घेतले होते. या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा हा, आयटी कंपनी विप्रोकडे असून, त्यांच्याकडे एकूण 4.43 कोटींची शत्रु संपत्ती आहे. ही संपत्ती 258.90 रुपये प्रति शेअरच्या हिशोबानं केंद्रानं विकली आहे. तर, भारतीय जीवन विमा कंपनीनं 3.86 कोटींची शत्रु संपत्ती विकत घेतली होती.

बीएसईनं दिलेल्या माहितीनुसार या शत्रु शेअरच्या विक्रीमुळं सरकारला 1,100 कोटी रुपये मिळणार आहेत. देशात सद्यस्थितीत तीन हजार करोड रुपयांचे शत्रु शेअर आहेत. तर, 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. दरम्यान 2017मध्ये एनिमी प्रॉपर्टी कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. यानुसार विभाजनंतर चीन आणि पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांच्या भारतातील संपत्तीवर कोणताही अधिकार राहणार नाही. या सुधारणेमुळं भारत सरकारला 1,100 कोटींचा फायदा झाला आहे.

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

First published: April 5, 2019, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading