सतीश शर्मा,(प्रतिनिधी)
उदयपूर,19 फेब्रुवारी:उदयपूरमधील (Udaipur) कुराबड परिसरातील चासदा येथील सरकारी शाळेतील (Government School) एका शिक्षकाला एकतर्फी प्रेम चांगलेच महागात पडले. शिक्षकाने विद्यार्थिनीला आय लव्ह यू (I Love You) म्हटले. यावरून शाळेतील संतप्त विद्यार्थ्यांनी शिक्षकाची यथेच्छ धुलाई केली. या प्रकरणी प्रशासनाने दखल घेत संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. गुरु-शिष्याला काळिमा फासणारी घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. प्रेम सिंह चूंडावत असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.
हेही वाचा... औरंगाबादेत भाजपला खिंडार, भाजपच्या माजी शरहाध्यक्षांनी बांधले 'शिवबंधन'मास्तर करत होता अश्लील कमेंट..
आरोपी शिक्षक प्रेम सिंह चूंडावत मागील काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनीवर अश्लील कमेंट करत होता. शिक्षकाच्या अशा वर्तनामुळे विद्यार्थिनी त्रस्त होत्या. मात्र, आरोपी शिक्षकाने एका विद्यार्थिनीला कागदावर आय लव्ह यू लिहून पाठवले. यानंतर आरोपी शिक्षकाचे कृत्य चव्हाट्यावर आले. पीडित विद्यार्थिनीने ही बाब आपल्या मित्रांना सांगितली. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आरोपी शिक्षकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून चांगलाच धडा शिकवला.
हेही वाचा... 'भाजप आमदारासह 7 जणांनी बलात्कार केला', महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखलसंतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकलं कुलूप
आरोपी शिक्षकाला विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना संपू्र्ण गावात पसरली. नंतर संतप्त गावकऱ्यांनी शाळेत पोहोचून गदारोळ केला. शाळेच्या संपूर्ण शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर शाळेला कुलूप ठोकलं. प्रकरणी जास्त वाढल्याने शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आरोपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा... नोकरदारांनो, पगारवाढीची अपेक्षा नकोच! यंदा Salary hike असू शकते सर्वांत कमी
Published by:Sandip Parolekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.