मुकेश कुमार, गोपाळगंज, 27 जानेवारी: बिहारमधील गोपाळगंज याठिकाणी एका क्रिकेट सामन्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. काही मुलं उभी असणाऱ्या ठिकाणी लागूनच असणाऱ्या शाळेचे छत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे(Accident In Gopalganj). या सरकारी शाळेमध्ये (Government High School) घडलेल्या घटनेमध्ये 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना बरौली याठिकाणी असणाऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना गोपालगंज याठिकाणी हलवण्यात आलं आहे. ही घटना बरौली हायस्कुलच्या मैदानावर घडली होती.
अशी माहिती समोर येते आहे की, प्रजासत्ताक दिनानिमित्त याठिकाणी क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी काही मुलं शाळेच्या छतावर बसले होते. सामना व्यवस्थित पाहत यावा याकरता त्या छताच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी त्यावर बसले होते. अधिक प्रमाणात भार सहन न झाल्याने छत कोसळलं आणि त्यात 10 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.
(हे वाचा-16 महिलांची हत्या करणारा Serial killer गजाआड; तुरुंगातून पळून करीत होता खून)
जखमी विद्यार्थ्यांना गोपाळगंजमधील रुग्णायलामध्ये भरती करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. मात्र सदर एसडीएमने या घटनेनंतर बरौलीच्या सीओंना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
(हे वाचा-प्रजासत्ताक दिनाला गालबोट, पोलीस स्टेशनमध्ये वृद्धाने घेतले पेटवून!)
आयोजकांकडून खेळण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती की नाही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि जर परवानगी घेतली गेली नाही तर संपूर्ण कार्यक्रमास आयोजकच जबाबदार असतील असं, त्यांनी म्हटले आहे. सदर एसडीएम उपेंद्र पाल म्हणाले की, संपूर्ण प्रकरणात एफआयआर नोंदवून पुढील कार्यवाही केली जाईल.