सिलेंडरच्या दरात दर महिन्याला वाढ होणार नाही ?

सिलेंडरच्या दरात दर महिन्याला वाढ होणार नाही ?

केंद्र सरकारने जून २०१६ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांना दर महिन्याला गॅस सिलेंडरचे दर ४ रुपयांनी वाढवण्याचे आदेश दिले होते

  • Share this:

28 डिसेंबर : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात दर महिन्याला ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेत सर्वसामान्यांना दिलासा दिलाय.

ऑक्टोबरमध्येच हा निर्णय मागे घेतल्याने गेल्या तीन महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली नसल्याचं समजतंय. दरम्यान या निर्णयासंदर्भात सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळणं बाकी आहे.

केंद्र सरकारने जून २०१६ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांना दर महिन्याला गॅस सिलेंडरचे दर ४ रुपयांनी वाढवण्याचे आदेश दिले होते. गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद करण्याच्या दिशेने सरकारने या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, ऑक्टोबरमध्ये सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, चीनला मागे टाकून भारत एलपीजीत सर्वांत मोठा आयातदार देश बनणार आहे. 'थॉमस रॉयटर्स एकॉन'च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमधील भारताची एकूण एलपीजी आयात २.४ दशलक्ष टन होणार आहे. या तुलनेत चीनची आयात २.३ दशलक्ष टन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 11:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading