मराठी बातम्या /बातम्या /देश /

कारमधल्या सहा एअरबॅग्जचा निर्णय पुढे ढकलला; गडकरींनी सांगितली पुढची तारीख

कारमधल्या सहा एअरबॅग्जचा निर्णय पुढे ढकलला; गडकरींनी सांगितली पुढची तारीख

केंद्र सरकारने कारमधल्या एअरबॅग्जबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 8 सीटपर्यंतच्या M 1 श्रेणीतल्या कारमध्ये आता सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने कारमधल्या एअरबॅग्जबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 8 सीटपर्यंतच्या M 1 श्रेणीतल्या कारमध्ये आता सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने कारमधल्या एअरबॅग्जबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 8 सीटपर्यंतच्या M 1 श्रेणीतल्या कारमध्ये आता सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : गेल्या काही महिन्यांमध्ये कार अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा काही दिवसांपूर्वी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या चर्चेत कारमधल्या एअरबॅग्ज हा घटक केंद्रस्थानी होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कारमधल्या एअरबॅग्जबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 8 सीटपर्यंतच्या M 1 श्रेणीतल्या कारमध्ये आता सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत; मात्र हा निर्णय आता एक ऑक्टोबर 2022 ऐवजी एक ऑक्टोबर 2023पासून लागू होणार आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (29 सप्टेंबर) याबाबतची माहिती दिली आहे.

नितीन गडकरी म्हणाले, की `सध्या ऑटो इंडस्ट्री ग्लोबल चेन सप्लायशी निगडित अडचणींचा सामना करत आहे. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.`

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहा एअरबॅग्जबाबतच्या योजनेवर मागील वर्षापासून काम सुरू केलं होतं. यापूर्वी मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून ड्रायव्हर एअरबॅग आणि 1 जानेवारी 2022 पासून फ्रंट पॅसेंजर एअरबॅग कारमध्ये असणं अनिवार्य केलं होतं. सध्या कोणत्याही कारच्या बेस व्हॅरिएंटमध्ये दोन एअरबॅग्ज दिल्या जातात. यात एक एअरबॅग ड्रायव्हरसाठी तर दुसरी फ्रंट पॅसेंजरसाठी असते.

ऑटोमोबाइल तज्ज्ञांच्या मते, एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये सहा एअरबॅग्ज दिल्याने कारच्या किमतींमध्ये सुमारे तीस हजार रुपयांनी वाढ होऊ शकते. मागच्या सीटवरील पॅसेंजर्ससाठी चार एअरबॅग्ज बसवण्याकरिता 8000 ते 9000 रुपये खर्च येऊ शकतो. एका एअरबॅगची किंमत सुमारे 1800 रुपये असते. त्याचप्रमाणे स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा खर्च वेगळा असतो. यामध्ये डिव्हाइस आणि लेबर कॉस्ट वाढते.

कार सीट बेल्ट अलार्म डिसेबल करण्यासाठी डिझाइन केलेल्या डिव्हाइसची विक्री थांबवण्याचे निर्देश या महिन्याच्या सुरुवातीला गडकरींनी ई-कॉमर्स कंपन्यांना दिले. गडकरी म्हणाले, `वाहनाने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षा ही सर्वांत महत्त्वाची आहे. 2024 च्या अखेरपर्यंत रस्ते अपघाताशी निगडीत मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं आमच्या मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.`

प्रवासादरम्यान कारमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग हे महत्त्वाचं साधन आहे. प्रवासावेळी समोरून येणारे वाहन कारवर आदळल्यास एका सेकंदापेक्षा कमी वेळेत एअरबॅग उघडून प्रवाशांचं डोके आणि छातीचं रक्षण करते. यामुळे शरीर डॅशबोर्डवर आदळण्यापासून बचाव होतो. एअरबॅगमुळे प्रवाशांना सुरक्षा मिळते; मात्र त्यासाठी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसेल तर एअरबॅगमुळे जखम होऊ शकते. मानेच्या हाडाला इजा होण्यासह चेहऱ्याला दुखापत होण्याचीही शक्यता वाढते.

टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रियर सीट बेल्ट रिमाइंडर अनिवार्य करण्यासाठी एका अधिसूचनेचा मसुदा जारी केला होता. त्या मसुद्यावर 5 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना नोंदवाव्यात, असं सांगण्यात आलं आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार मसुद्यात बदल केला जाणार आहे.

नोटिफिकेशननुसार, मंत्रालयाने एन आणि एम व्हेईकलसाठी हे मसुदा नियम जारी केले आहेत. एम श्रेणीचा अर्थ असा की ज्या फोर व्हीलर्समधून प्रवासी प्रवास करतात. एन श्रेणी म्हणजे अशी वाहनं की ज्यांना किमान चार चाकं असतात आणि त्यांचा वापर माल आणि प्रवासी वाहतुकीकरिता केला जातो.

भारतात पाच टक्के कार चालक सीट बेल्ट लावत नाहीत. युरोपात हे प्रमाण दोन टक्के तर अमेरिकेत पंधरा टक्के आहे. त्याचप्रमाणे 77 टक्के स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्ही चालक सीट बेल्टचा वापर करत नाहीत. 62 टक्के चालकांना रियर सीट बेल्ट अनिवार्य आहे हे माहितीच नसतं. देशातलं रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता कारमधून प्रवास करत असताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारमधून प्रवास करताना लक्ष विचलित होऊ देऊ नये. ओव्हरटेक करताना पुरेशी काळजी घ्यावी, दुसऱ्या वाहनांपासून योग्य अंतर ठेवावं. ट्रॅफिक सिग्नल्सचे पालन करावं. कारमध्ये सीटबेल्ट अवश्य लावावेत आणि ऑप्टिमम स्पीड लिमिट कायम ठेवावं.

कारच्या बेस व्हॅरिएंटमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स दिलेली असतात. त्यात ड्युएल फ्रंट एअरबॅग, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, हाय माउंटेड स्टॉप लॅंप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, रिअर पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन या प्रमुख फीचर्सचा समावेश असतो.

First published:

Tags: Nitin gadkari