समलैंगिक जोडप्याला लग्नास परवानगी मिळणार का? उच्च न्यायालयात सरकारचं मोठं विधान

समलैंगिक जोडप्याला लग्नास परवानगी मिळणार का? उच्च न्यायालयात सरकारचं मोठं विधान

याचिकेमध्ये स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन महिलांनी लग्नासाठी परवानगी मागितली होती. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट (एसएमए) अंतर्गत दोन महिलांमध्ये लग्न होऊ शकत नाही आणि त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करायला हवं, असं सरकारनं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : भारतात लग्न (Marriage) म्हणजे दोन लोकांमधील भेटच नव्हे तर ती  पुरुष आणि स्त्री यांच्यातली एक जोड आहे. दिल्ली उच्च न्यायालयात  (Delhi High Court) समलैंगिक लग्नाला (Same Sex Marriage) विरोध दर्शविताना केंद्र सरकारने हे सांगितले. त्यात म्हटलं आहे, की न्यायालयीन हस्तक्षेपामुळे पर्सनल लॉमध्ये पूर्णपणे बदल होईल. त्यात म्हटले आहे की बायोलॉजिकल पुरुष पती आणि बायको म्हणजेच बायोलॉजिकल स्त्री व्यतिरिक्त लग्नासंबंधीच्या अन्य व्याख्या सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक ठरवतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत केंद्र सरकारनं म्हटलं, न्यायालयानं आपल्या निर्णयात समलैंगिक संबंधांमधील काही  वर्तन गुन्हेगारीमुक्त केले आहेत मात्र कायदेशीर नाही. त्यात म्हटले आहे, की विवाह निश्चितपणे दोन सामाजिक मान्यताप्राप्त व्यक्तींचे एकत्रिकरण आहे. केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, समान लिंगातील दोन व्यक्तींमधील विवाहाला एकतर वैयक्तिक कायद्यात किंवा संहिताबद्ध वैधानिक कायद्यात स्वीकारलं गेलं नाही. दरम्यान, दिल्ली सरकारने अशाच एका याचिकेवर म्हटलं आहे, स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट (एसएमए) अंतर्गत दोन महिलांमध्ये लग्न होऊ शकत नाही आणि त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करायला हवं.

दिल्ली सरकारनं एका याचिकेवर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे. या याचिकेमध्ये स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन महिलांनी लग्नासाठी परवानगी मागितली होती. समान अधिकार कार्यकर्ता गोपी शंकर एम, गिती थडानी आणि जी ओ उर्वशी यांनी याचिका दाखल करत म्हटलं, की सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक संबंधांमधील लैंगिक संबंधांना परवानगी दिलेली असतानाही समलैंगिक जोडप्यांना लग्नासाठी परवानगी मिळणं शक्य होत नाही. त्याला उत्तर देताना केंद्रानं म्हटलं आहे की, नवतेजसिंग जोहर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये केवळ एका विशिष्ट मानवी वर्तनाला अपराधमुक्त केलं होतं.

Published by: Kiran Pharate
First published: February 26, 2021, 9:55 AM IST

ताज्या बातम्या