मुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार!

मुख्यमंत्र्यांचा दणका; 9 वाजता कार्यालयात न पोहोचल्यास पगार कापणार!

Come Office On Time : सरकारी अधिकारी वेळेत हजर न झाल्यास त्यांचा पगार कापला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, प्रशांत लिला रामदास, 27 जून : साहेब अजून आले नाहीत, येतील थोड्या वेळात वाट पाहा ! सरकारी ऑफिसमध्ये मिळणारी ही उत्तरं काही नवीन नाहीत. कामानिमित्त सरकारी ऑफिसमध्ये सकाळी वेळेत गेल्यानंतर अनेक वेळा साहेब येत आहेत, बसा थोडा वेळ ही उत्तरं ऐकायला मिळतात. पण, आता वेळेत न येणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. अधिकारी सकाळी 9 वाजता कार्यालयामध्ये न पोहोचल्यास पगार कापण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्याबाबतचं ट्विट देखील योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंत्र्यांनी घरातून काम करू नये शिवाय, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

राज्यात या दिवसांमध्ये होणार मुसळधार पाऊस

कामाचा होतो खोळंबा

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी एक म्हण देखील आहे. सरकारी काम घेऊन ऑफिसमध्ये सकाळी लवकर गेल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याचा मनस्ताप हा अनेकांना सहन करावा लागतो. त्यामुळे मनाची चिडचिड होते, शिवाय, वेळ देखील वाया जातो. सरकारी बाबुंच्या या वृत्तीमुळे अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो. पण, आता राज्य सरकार याबद्दल कठोर पावलं उचलताना दिसत आहेत.

आता गोदरेज घराण्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद, हे मुंबई आहे कनेक्शन

'लंच टाईम वेळेत आटपा'

महाराष्ट्रात देखील लंच टाईमला गेलेला अधिकारी हा वेळेत न आल्यानंतर त्याचा फटका हा नागरिकांना बसलेला आहे. त्यावर नागरिकांकडून उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली जाते. पण, आता राज्य सरकारनं देखील या सर्व बाबींची दखल घेत लंच टाईम वेळेत संपवा असे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे सरकारी अधिकाऱ्यांना लंट टाईम अर्ध्या तासात संपवणं गरजेचं आहे.

VIDEO: सोनसाखळीसाठी घरातच घुसला, नागरिकांनी बेदम दिला चोप

First published: June 27, 2019, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading