मराठी बातम्या /बातम्या /देश /

कम्प्युटर ऑपरेटरला लाच घेताना अटक, BPL कार्ड बनवण्यासाठी मागितली 10 रुपयांची लाच

कम्प्युटर ऑपरेटरला लाच घेताना अटक, BPL कार्ड बनवण्यासाठी मागितली 10 रुपयांची लाच

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Computer operator arrested for taking bribe: सरकारी कार्यालयात काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याचं तुम्ही ऐकलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील. असाच एक प्रकार आता समोर आला असून कम्प्युटर ऑपरेटरने मागितलेल्या लाचेच्या रक्कमेमुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sunil Desale

गुजरात, 29 डिसेंबर : सरकारी कर्मचाऱ्यांनी (Government employee) किंवा अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचं तुम्ही ऐकलं असेल. तसेच त्यांनी लाच (bribe) म्हणून घेतलेली रक्कम ही हजारो, लाखो किंवा कोटींच्या घरात असल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. आता सरकारी कार्यालयातील एका कम्प्युटर ऑपरेटरला लाच (Computer operator arrest accepting bribe) घेताना अटक केल्याची माहिती समोर आली आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच कारण म्हणजे त्याने लाच म्हणून घेतलेली रक्कम आहे. (Computer operator arrested while taking bribe of Rs 10)

10 रुपयांपासून ते 105 रुपयांची लाच

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील नांदोद जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. तांदोद तालुक्यातील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कम्प्युटर ऑपरेटरने बीपीएल कार्ड बनवण्यासाठी 10 रुपयांची लाच मागितली होती. बीपीएल कार्ड बनवण्यासाठी 10 रुपयांपासून ते 105 रुपयांची लाच घेण्यात येत असल्याती माहिती समोर आली आहे. या संदर्भात माहिती मिळताच एका जागृत नागरिकाने याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

वाचा : फॅक्टरीत होती अंडरग्राऊंड टाकी, अजब जागी लपवला होता करोडोंचा खजिना

बीपीएल कार्डसाठी लाच

ही माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आरोपी प्रविणकुमार हा तहसील कार्यालयात कंत्राटी पदावर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. त्याने बीपीएल सर्टिफिकेट बनवून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. बीपीएल कार्ड हे मोफत बनवून मिळते मात्र, असे असतानाही आरोपी प्रविणुकमार याने 10 रुपयांची लाच मागितली होती.

कम्प्युटर ऑपरेटर प्रविणकुमार याने बीपीएल सर्टिफिकेट बनवून दण्यासाठी 10 रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रविणकुमार याला पोलिसांनी अटक केली. सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाच मागण्याच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र, 10 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

वाचा : नाशिकसह धुळे, नंदुरबारात आयकर विभागाचे छापे, 240 कोटींची मालमत्ता जप्त

निवृत्तीपूर्वी 7.50 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत

गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून तब्बल 7.5 लाखाची लाच घेताना सोलापूर येथील सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना जुलै महिन्यात समोर आली होती. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे असे दोघा लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हुंडा न घेतल्याने गाजलेला इन्स्पेक्टर लाच घेताना अटक

हुंडा न घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला इन्स्पेक्टर आता लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. पोलीस दलात अनेक अधिकारी लाच घेऊन काम करत असल्याचा अनुभव सर्वसामान्य जनतेला नेहमीच येत असतो. त्यात काही सन्माननीय अपवादही असतात, मात्र बहुतांश जनतेला पोलीस आणि लाचखोरी यांचा जवळचा संबंध असल्याचे अनुभव येत असतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून हा अनुभव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

First published:

Tags: Crime news, Government, Gujarat