देशातील रेमडेसीवीरचे उत्पादन करणाऱ्या सर्व उत्पादकांना त्यांच्या संकेतस्थळांवर त्यांच्या इंजेक्शनचे स्टॉकिस्ट आणि वितरक यांची माहिती प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज असणाऱ्यांना औषधाची उपलब्धता सहज व्हावी यासाठी संकेतस्थळावर ही माहिती टाकण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर इंजेक्शनची साठेबाजी आणि काळाबाजार कमी करण्यासाठी अन्न व औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनादेखिल वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. वाचा - धुळे: रुग्णवाहिका न मिळाल्यानं कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह देशभरातून आगामी काही दिवसांमध्ये रेमडेसीवीरच्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं औषध विभागानं इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांशी संपर्क करून या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्याचंही केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.Export of injection Remdesivir and Remdesivir Active Pharmaceutical Ingredients (API) prohibited till the COVID19 situation in the country improves: Government of India pic.twitter.com/KLENjzTNyn
— ANI (@ANI) April 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus