• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारनं उचललं हे पाऊल

रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारनं उचललं हे पाऊल

Indian Railway : सरकार राजधानी आणि शताब्दी ट्रेन या चालवण्यासाठी खासगी कंपन्यांकडे देण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 जून : भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता सरकार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. सरकार राजधानी आणि शताब्दी ट्रेन या चालवण्यासाठी खासगी कंपन्यांकडे देण्य़ाची शक्यता आहे. तसंच, प्रीमियम ट्रेनचं कंत्राट देखील सरकार खासगी कंपन्यांना देणार आहे. रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल काय भूमिक जाहीर करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सर्वात मोठं जाळं हे रेल्वेचं आहे. लाखो प्रवासी दरदिवशी रेल्वेतून प्रवास करतात. यावेळी प्रवाशांनी अनेक तक्रारी देखील केलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खानपानाबद्दल देखील प्रवाशांच्या तक्रारी येतात. त्यावर उपाय म्हणून सरकार हे पाऊल उचलणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी रेल्वे बजेटमध्ये याची घोषणा होणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. पुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा; रायफल घेऊन पळालेल्या दोन SPOचा देखील समावेश मुंबईकरांची अपेक्षा मुंबई लोकलमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. पण, वाढती गर्दी आणि लोकलचा खोळंबा यामुळे मुंबईकर देखील त्रस्त आहेत. रेल्वेसाठी काहीतरी ठोस पावलं उचल अशी मागणी मुंबईकर करत असतात. पण, दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमधून मात्र मुंबईला अपेक्षित काही हाती लागत नाही. त्यामुळे यंदाच्या बजेटमधून तरी मुंबईकरांना काही मिळणार का? हे पाहावं लागणार आहे. मुंबईतील सर्व खासदार युतीचे लोकसभा निवडणुकीमध्ये देखील मुंबईकरांनी शिवसेना - भाजप युतीला भरभरून मतदान केलं. त्यामुळे शिवसेना - भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. मुंबईकरांच्या मतांचा कौल लक्षात घेता मुंबईकरांना काय मिळणार हे पाहावं लागणार आहे. नाशिकमध्ये फक्त 8 टक्के पाणीसाठा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  First published: