खासगी कारलाही भाडं घेण्याची मान्यता मिळणार, सरकार बदलणार कायदा

खासगी कारलाही भाडं घेण्याची मान्यता मिळणार, सरकार बदलणार कायदा

तुमच्या खासगी गाडीचा वापर आता तुम्ही इतर प्रवाशांना लिफ्ट देऊ शकाल आणि त्यासाठी रीतसर भाडं आकारू शकाल. सरकार परिवहन कायद्यात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : तुमच्याकडे स्वतःची कार आहे? तुमच्या रोजच्या वापराबरोबर ती आता कमाईचं साधनही ठरू शकेल. तुमच्या खासगी गाडीचा वापर आता तुम्ही इतर प्रवाशांना लिफ्ट देऊ शकाल आणि त्यासाठी रीतसर भाडं आकारू शकाल. सरकार परिवहन कायद्यात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. खासगी गाड्यांचा कमर्शियल वापर या कायदा बदलामुळे शक्य होईल.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका बातमीनुसार, व्हेइकल पूलिंग योजनेचा केंद्र सरकार विचार करत आहे. या परिवहन मंत्रालयाच्या योजनेला मंजुरी मिळाली तर कॅब आणि टॅक्सीसारखी सेवा खासगी कारमालकसुद्धा देऊ शकतील. फक्त ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागेल. खासगी कारचालक दिवसाला 3 ते 4 फेऱ्याच कमर्शियल ट्रिपच्या करू शकतो, असा त्यात नियम असणार आहे.

VIDEO: बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल

राज्यांच्या RTO बरोबर खासगी गाड्यांची नोंदणी करावी लागेल आणि एका अॅग्रिगेटरच्या माध्यमातून अशी सेवा देऊ इच्छिणाऱ्या सर्व खासगी कार मालकांचं KYC (know your customer)प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. खासगी कार मालकांना भाडं घेण्याआधी प्रवाशांचा विमाही उतरवावा लागेल.

First published: May 11, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading