मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकारची नवी योजना, विद्यार्थाच्या आईच्या बॅंक खात्यावर थेट जमा होतील 15 हजार

सरकारची नवी योजना, विद्यार्थाच्या आईच्या बॅंक खात्यावर थेट जमा होतील 15 हजार

आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित असणाऱ्या राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना असून मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, या उद्देशाने सरकारने ही योजना तयार केली आहे.

    हैदराबाद,10 जानेवारी: आंध्र प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'अम्मा वोडी'ची घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे. या योजनेंतर्गत मुलांच्या शाळेत आईच्या बँक खात्यात दरवर्षी 15 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित असणाऱ्या राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना असून मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, या उद्देशाने रेड्डी सरकारची ही योजना आहे. मु्ख्यमंत्री रेड्डी यांनी गुरुवारी लॅपटॉपचे बटन दाबून या योजनेचा श्रीगणेशा केला. 82 लाख मुलांना लाभ मिळणार.. तिरुपतीपासून 70 किलोमिटर अंतरावर असलेल्या चित्तूरमध्ये एका जनसभेला मुख्यमंत्री रेड्डी यांनी संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना 'अम्मा वोडी' या योजनेची माहिती दिली. राज्यातील 82 लाख मुलांना 'अम्मा वोडी' या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत मुलांच्या आईच्या बँक खात्यावर दरवर्षी 15 हजार रुपये सरकारतर्फे जमा करण्यात येणार आहेत. सरकार जवळपास 43 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार असून यासाठी 6318 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले, शासकीय शिक्षण संस्थांमधील सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहेय राज्यातील 45 हजार सरकारी शाळा, 471 विद्यालये आणि 148 महाविद्यालये तसेच वसतिगृहांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, सरकारी कर्मचारी तसेच प्राप्तीकर भरणाऱ्यांच्या मुलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. 'अम्मा वोडी'ची अशी सुचली कल्पना.. सन 2017 आणि 2018 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी राज्यात पदयात्रा काढली होती. या दरम्यान अम्मा ओडी योजनेची कल्पना सुचल्याचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी यावेळी सांगितले. घरातील आर्थिक परिस्थित बिकट असल्याने बहुतांश महिला आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे या पदयात्रेदरम्यान समोर आले होते.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Andhra pradesh, Andhra Pradesh CM

    पुढील बातम्या