नवी दिल्ली, 23 एप्रिल : सध्या अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात पायपीट सुरू आहे. अशा वेळी जर सरकारी नोकरी मिळाली तर? हो, तुम्हाला आता सरकारी नोकरी संधी चालून आली आहे. कारण, युनिर्व्हसीटी ऑफ हेल्थ साइंजेसमध्ये भरती निघाली आहे. यामध्ये ग्रुप सीमध्ये 976 पदाची भरती निघाली आहे. ज्यामध्ये स्टेनो, क्लार्क, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी टेक्निशियन, स्टोअर किपर, लॅबोरेटरी अटेंडट आणि ऑपरेटिंग या जागांकरता भरती निघाली आहे. त्यामुळे तुम्ही जर का सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, तुम्हाला ही सुवर्ण संधी चालून आली आहे. त्यामुळे वेळ न दवडता तुम्ही देखील नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी
तुम्ही जर दहावी पास असाल त्यानंतर देखील तुम्ही युनिर्व्हसीटी ऑफ हेल्थ साइंजेसमध्ये नोकरीकरता अर्ज करू शकता. यामध्ये काही जागांवरती दहावी पास विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. याबाबतची अधिक माहिती uhsr.ac.in वर उपबल्ध आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा
स्टाफ नर्स – 595, क्लार्क – 54, स्टेनो टायपिस्ट – 30, स्टेनो किपर – 25, लॅबोरेटरी टेक्निशियन – 113, लॅबोरेटरी अटेंडंट – 123, ऑपरेटिंग थिअटर टेक्निशियन - 36
या तारखा लक्षात ठेवा
22 मे 2019 या दिवशी तुम्हाला फॉर्म भरायवयाचा आहे.
15 मे 2019 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
15 मे 2019 या दिवशी तुम्हाला पैसे भरायचे आहेत.
मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले पाहा VIDEO