फ्लाईट रद्द झाली तर पैसे परत, विमान प्रवाशांसाठी सरकारच्या नव्या सुविधा

फ्लाईट रद्द झाली तर पैसे परत, विमान प्रवाशांसाठी सरकारच्या नव्या सुविधा

जयंत सिन्हा म्हणाले, ' विमान प्रवाशांच्या अधिकारांमध्ये वाढ केली गेलीय. त्यामुळे विमान कंपन्यांची मनमानी संपेल. एखादं विमान ४ तास उशीर करत असेल आणि तिकीट रद्द केलं तर प्रवाशाला पूर्ण भरपाई मिळेल.'

  • Share this:

नवी दिल्ली, २२ मे : केंद्र सरकारनं विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आणलीय. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं, जर विमानाचं उड्डाण रद्द झालं तर प्रवाशांना त्याची भरपाई मिळणार. किंवा तिकिटाचे रिफंड मिळेल. याशिवाय विमानाला उशीर झाला तरीही प्रवाशांना भरपाई मिळू शकेल.

जयंत सिन्हा म्हणाले, ' विमान प्रवाशांच्या अधिकारांमध्ये वाढ केली गेलीय. त्यामुळे विमान कंपन्यांची मनमानी संपेल. एखादं विमान ४ तास उशीर करत असेल आणि तिकीट रद्द केलं तर प्रवाशाला पूर्ण भरपाई मिळेल.'

काय आहे सुविधांचा प्रस्ताव?

तिकीट २४ तास अगोदर रद्द केलं तर काही चार्जेस लागणार नाहीत.

विमान रद्द झाल्याची सूचना २४ तास आधी दिली नाही, तर विमान कंपनीला प्रवाशांना दोन तासात दुसरं विमान उपलब्ध करून द्यायला हवं, नाहीतर ताबडतोब रिफंड द्यायला हवा.

विमानाचं बेसिक भाडं आणि इंधनाचा खर्च एवढाच कॅन्सलेशन चार्ज घ्यायला हवा.

First published: May 22, 2018, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading