पुलवामा हल्ल्याची माहिती आधीपासून होती - प्रकाश आंबेडकर

पुलवामा हल्ल्याची माहिती आधीपासून होती - प्रकाश आंबेडकर

पुलवामा हल्ल्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. पुलवामा येथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती. मंत्रिमंडळाकडे तसा मेसेज देखील होता. पण, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारनं या मॅसेजकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

दरम्यान, सैन्याची वाहने जात असताना ज्या गाडीवर हल्ला झाला त्या गाडीवर बॉम्ब हल्ल्याचा प्रभाव कमी करण्याची सिस्टीम नाही हे त्या दहशतवाद्याला कसे माहित? असा सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी ही बाब स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काही सवाल केले आहेत.

'एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत'

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एअर स्ट्राईकवर सवाल करत पुराव्यांची मागणी केली आहे. यापूर्वी देखील अनेकांनी एअर स्ट्राईकवर सवाल करत पुराव्यांची मागणी केली आहे.

पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईक

14 फेब्रुवारी रोजी सैन्यावर पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून करण्यात आलेल्या  हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

त्यानंतर अवघ्या 12 दिवसात भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. ज्यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. दरम्यान , पुलवामा हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला सुरूवात केली असून आत्तापर्यंत टॉपच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First published: March 31, 2019, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading