Home /News /national /

लाखो शेतकऱ्यांसाठी खूशखबर, व्याजावरील अनुदानाची सूट वाढवली

लाखो शेतकऱ्यांसाठी खूशखबर, व्याजावरील अनुदानाची सूट वाढवली

केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजना, दुग्धव्यवसायासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) शेतकऱ्यांना खूशखबर देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने पीक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) आता ऐच्छिक केली आहे. याच्या व्यतिरिक्त ईशान्येतील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा 90 टक्के हप्ता हा सरकार भरणार आहेत. तर या कॅबिनेटमध्ये व्याज सहायता योजनेच्या (Interest Subvention Scheme) परतावा वाढवून 2.5 टक्के करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 95 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 'पीक विम्याचा 5.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा'  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा 5.5 कोटी शेतकऱ्यांनी घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत एकूण 13 हजार कोटी रुपयांचा प्रिमियम जमा झाला आहे. तर 60 हजार कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काही कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाने पीक विमा योजनेच्या दुरुस्तीलाही मंजूरी दिली आहे. आणि याला शेतकऱ्यांसाठी ऐच्छिकही ठेवण्यात आलं आहे.ॉ  नोकरदारांनो, पगारवाढीची अपेक्षा नकोच! यंदा Salary hike असू शकते सर्वांत कमी कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत आता केंद्र आणि राज्य सरकार हप्त्यातील अर्धी अर्धी रक्कम देत होते. मात्र ईशान्येच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता तिथल्या शेतऱ्यांचा 90 टक्के प्रमियम केंद्र सरकार भरमार आहे. आणि 10 टक्के राज्य सरकार भरणार आहे. दुग्धव्यवसायासाठी साडेचार हजार कोटींच्या योजनेला मंजुरी - सरकारने दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी 4 हजार 558 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आलीय. याचा सुमारे 95 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे देशातील दुग्धक्रांतीला मोठा फायदा होणार असल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Farmer

    पुढील बातम्या