दिल्लीत होणार महाराष्ट्राचा फैसला? शहा-फडणवीस तर सोनिया-पवार यांची भेट आज!

दिल्लीत होणार महाराष्ट्राचा फैसला? शहा-फडणवीस तर सोनिया-पवार यांची भेट आज!

महाराष्ट्रातील नव्या सरकारसंदर्भातील निर्णयाची सूत्रे आता दिल्लीत पोहोचली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सुद्धा शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपद आणि अन्य महत्त्वाच्या खात्यावरून वाद सुरू आहेत. सरकार स्थापनेचा निर्णय मुंबईत ठरत नसल्याने अखेर याबाबतचा निर्णय आता दिल्ली दरबारी गेला आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारसंदर्भातील निर्णयाची सूत्रे आता दिल्लीत पोहोचली आहेत. यासंदर्भात आज दिल्लीत दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. यातील एक बैठक सत्ताधाऱ्यांकडून असेल तर दुसरी विरोधकांची आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (सोमवारी) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. पवारांची ही भेट म्हणजे राज्यात भाजप शिवायचे सरकार स्थापनेची एक शक्यता म्हणून पाहिले जात आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट राष्ट्रीय आपतकालीन निधीसंदर्भात आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात केंद्राकडून मदत मागण्यासाठी ही भेट होणार असल्याचे समजते. अर्थात या बैठकी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांवर देखील चर्चा होईल असा अंदाज आहे.

शिवसेने सत्तास्थापनेसंदर्भात 50-50 या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्याय महाआघाडीकडे आहे. यासंदर्भात आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होत आहे. रविवारीच राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीनंतर एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, शिवसेनेकडून अद्याप समर्थन देण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आमच्याकडे 54 जागा आहेत आणि जर सेना-भाजपमधील वाद संपला नाही तर सरकार बनवण्यात आमची भूमिका महत्त्वाची असेल.

शिवसेनेसाठी सरकार स्थापन करणे सोप नाही

भलेही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असली तरी सरकार स्थापन करण्यासाठीचे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तरी बहुमत गाठण्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत लागले.

राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या