Home /News /national /

UIDAI च्या या एका आदेशानंतर कोट्यवधी लोकांचे Aadhar Card अमान्य, जाणून घ्या सरकारचा आदेश

UIDAI च्या या एका आदेशानंतर कोट्यवधी लोकांचे Aadhar Card अमान्य, जाणून घ्या सरकारचा आदेश

Aadhaar News: खुल्या बाजारातून तयार केलेल्या आधार PVC कार्ड (PVC Aadhaar card) ला UIDAI ने अमान्य घोषित केलं आहे.

  नवी दिल्ली, 19 जानेवारी – आधारकार्डच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. UIDAI ने खुल्या बाजारात तयार करण्यात येणारे पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar card) ला अमान्य घोषित केलं आहे. अधिकृतरीत्या UIDAI ने जारी केलेलं आधार कार्ड (Aadhar PVC card latest news) कोणतीही व्यक्ती 50 रुपयांचे शुल्क अदा करून हे आधार कार्ड मागवले जाऊ शकते. बाजारात तयार करण्यात येत असलेल्या पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) अमान्य असल्याची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे. आज-कालच्या आयुष्यात आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज झाला आहे. जवळपास सर्व आवश्यक कामांसाठी आधार कार्डची गरज भासते.

  विमान प्रवासादरम्यान हे प्रश्न विचारल्यास मिळतात खोटी उत्तरं; एअर होस्टेसने केला खुलासा

  त्यामुळे जर तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड आपल्या जवळच्या दुकानातून बनवले असेल, तर ते बदला आणि नव्या आधार कार्डसाठी UIDAI मध्ये अर्ज दाखल (Aadhaar card apply) करा. अमान्य का झाले? काही दिवसांपूर्वी UIDAI नेच आधार पीव्हीसी कार्ड जारी केले होते. एटीएम, ऑफिस आयकार्ड किंवा डेबिट कार्डच्या आकाराचे असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये ठेवले जाऊ शकते. यामध्ये सुरक्षिततेचे अनेक फिचर्स (Aadhaar PVC card security features) असतात.

  तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? वयानुसार Crocin, Calpol, Dolo चे हे आहे योग्य प्रमाण

  जसं की पीव्हीसी आधारमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून तुमच्या ओळखीची त्वरित पडताळणी केली जाऊ शकते. परंतु लोकांनी आपल्या सोयीनुसार UIDAIकडून पीव्हीसी आधार कार्ड मागवण्याऐवजी जवळच्या दुकानातूनच ते बनवले. सुरक्षित नाही असे आधार कार्ड अशा प्रकारच्या आधार कार्डमध्ये सुरक्षा फिचर्स नसतात, ते असुरक्षित असतात. त्यामुळे UIDAI ने आता खुल्या बाजारातून पीव्हीसी आधारच्या कॉपीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की आम्ही बाजारातून बनवलेल्या आधारच्या कॉपीचा वापर करण्याचे समर्थन करू शकत नाही. कारण यामध्ये कोणतीही सुरक्षेचे वैशिष्ट्य नसते. तुम्ही 50 रुपये (जीएसटी आणि स्पीड पोस्ट शुल्कासह) जमा करून आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. फक्त हे मान्य UIDAI च्या म्हणण्यानुसार, uidai.gov.in वरून डाउनलोड करण्यात आलेले आधार किंवा आधार लेटर किंवा एम-आधार (M-Aadhaar) प्रोफाइल किंवा UIDAIकडून जारी करण्यात आलेले आधार पीव्हीसी कार्ड त्याद्वारेच आधार कार्ड (Aadhaar Card) शी संबंधित कामामध्ये वापर केला जाऊ शकतो.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Aadhar card, Central government, Lifestyle, UIDAI

  पुढील बातम्या