सरकारी कंत्राटदार मालामाल; अघोषित रक्कम पाहून आयकर अधिकारीही हादरले

दोन वर्षांपूर्वी रस्ते उभारणाऱ्या कंत्राटदाराकडून अशीच मोठी रक्कम सापडली होती.

दोन वर्षांपूर्वी रस्ते उभारणाऱ्या कंत्राटदाराकडून अशीच मोठी रक्कम सापडली होती.

  • Share this:
    चेन्नई, 18 डिसेंबर : तामिळनाडूमध्ये सरकारी कामं घेणाऱ्या एका कंत्राटदाराच्या  (Government Contractor) विविध कामाच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यादरम्यान प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 700 कोटी रुपये (तब्बल 950 मिलियन यूएस डॉलर)  (Unaccounted Income) जप्त केले आहे. सोबतच अधिकाऱ्यांनी 21 कोटींची रोकडही जप्त केली आहे. इतकी मोठी Unaccounted Income पाहून आयकर अधिकाऱ्यांना धक्का बसला. आयकर विभागानुसार कंत्राटदाराच्या चेन्नई आणि इरोडस्थित ठिकाण्यांवर 14 आणि 15 डिसेंबर रोजी सर्च ऑपरेशन चालविण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी अद्याप कंत्राटदाराचं नाव जाहीर केलेलं नाही. या ऑपरेशनमध्ये सामील अधिकारी विशेष करुन तमिळनाडूच्या चेन्नईमधील समुद्र किनाऱ्याजवळी भिंत तोडून बसची ये-जा करण्यासाठी रस्ते तयार करणे, मॅरेज होम चालवणे आणि स्वयंपाकासंबंधित मसाल्याच्या कामाशी जोडलेल्या प्रकरणांची माहिती मिळवून पाहत होते. अधिकाऱ्यांच्या समोर आल्याप्रमाणे कंत्राटदाराची टीम सामानांची खरेदी आणि अन्य खर्चांमध्ये फसवणूक करीत आहे. आयकर अधिकाऱ्यांनुसार कंत्राटदाराने 700 कोटींची अघोषित आयबद्दल सांगितलं की, ही रिअर स्टेट आणि अन्य व्यापारांशी जोडलेली आहे. कंत्राटदाराने केवळ 150 कोटी रुपये अघोषित आय असल्याचे स्वीकारले आहे. यापूर्वीही सरकारी कंत्राटदारांकडे इतकी मोठी अघोषित आय सापडली आहे. दोन वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये रस्ते उभारणीशी जोडलेल्या एका कंत्राटदाराला छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 100 कोटी रुपयांची रोख आणि 90 किलो सोनं सापडलं होतं. आयकर विभागाने ही छापेमारी कंत्राटदार नागरादन सेय्यदुरईची कंपनी एसपीके ग्रुपच्या 22 कार्यालयांमध्ये केली होती. एसपीके ग्रुप प्रदेश सरकार सोबत मिळून रस्ते आणि राजमार्गाची उभारणी करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: