नवी दिल्ली, 30 मार्च : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे रोजंदारीवर मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर परिणाम झाला आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नाही. आता सरकार अशा व्यक्तींना थेट पगार देण्याचा विचार करत आहेत. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार इंडस्ट्रीला मिळणाऱ्या पॅकेजमध्ये हा महत्वाचा भाग आहे. यानुसार बेरोजगार लोकांना पगार मिळण्याची शक्यता आहे.
सर्व व्यवसाय ठप्प झाल्यानं बेकार झालेल्यांना थेट पगार देण्याचा विचार केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अंगावर कोसळलेल्या कामगारांना पगाराच्या 50 टक्के रक्कम देण्याचा पर्याय वापरला जाऊ शकतो. यात किमान रक्कम देण्याचा पर्यायही आहे.
कर्मचाऱ्यांना किमान 5 हजार रुपये दिले जाऊ शकतात. तिसऱ्या पर्यायामध्ये हे सबसिडीस्वरुपात दिलं जाऊ शकतं किंवा पगाराचा एक भाग व्याज विरहीत कर्ज म्हणूनही देण्याची शक्यता आहे. हे कर्ज कंपन्यांना दिलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयात यावर नीति आयोग आणि अर्थ मंत्रालयाची बैठक झाली. इंडस्ट्री सहायता पॅकेजची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
हे वाचा : लॉकडाउनमध्ये लग्न! दोन वऱ्हाडींच्या उपस्थितीत केले विधी पण नवरीशिवाय परतले घरी
देशात कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी लॉकडाउनची घोषणा करताना म्हटलं होतं की, देशाकडून ते काही आठवडे मागत आहेत ज्यामुळे या गंभीर साथीच्या रोगाशी लढता येईल. जर लोकांची गर्दी राहिली तर समाजात याचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका आहे. यासाठी 21 दिवस लॉकडाउन करण्यात येत आहे.
हे वाचा : चीनमध्ये कोरोनावर विजय मिळवल्याचा आनंद; कुत्रा-मांजर, वटवाघुळाच्या मांसची पार्टी मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.