मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी : TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर मोदी सरकारची बंदी

मोठी बातमी : TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर मोदी सरकारची बंदी

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून याअंतर्गत 59 Mobile Apps बंद करण्यात येणार आहे

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून याअंतर्गत 59 Mobile Apps बंद करण्यात येणार आहे

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून याअंतर्गत 59 Mobile Apps बंद करण्यात येणार आहे

नवी दिल्ली, 29 जून : भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) बंदी घालायचा मोठा निर्णय मोदी सरकारने (modi government) घेतला आहे. TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा (Mobile apps)यात समावेश आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिकटॉक, हेलो, शेअरइट, UC ब्राउझर, UC news अशा अनेक अॅप्स भारतीयांसाठी बंद करण्यात आली आहेत. बंदी घातलेली बहुतेक सर्व मोबाईल अॅप्स चिनी आहेत.

देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे.

मालवेअर आणि शंकास्पद अॅप्सची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

ही आहे बंद असलेल्या अॅप्सची यादी

TikTok

Shareit

Kwai

UC Browser

Baidu map

Shein

Clash of Kings

DU battery saver

Helo

Likee

YouCam makeup

Mi Community

CM Browers

Virus Cleaner

APUS Browser

ROMWE

Club Factory

Newsdog

Beutry Plus

WeChat

UC News

QQ Mail

Weibo

Xender

QQ Music

QQ Newsfeed

Bigo Live

SelfieCity

Mail Master

Parallel Space

दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागानेही (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे. काही ऑनलाइन फिल्म्स आणि वेबसीरिज पाहणं चांगलंच महागात पडू शकतं, असं सरकारने सांगितलं आहे. ऑनलाइन फिल्म्स पाहण्याच्या नादात तुमचा प्रायव्हेट डेटा चोरीला जाऊ शकतो. हॅकर्स यावर टपून बसले आहेत. अशी सूचना जारी करण्यात आली आहे. असे दहा चित्रपट आणि दहा वेबसीरिजची यादी सरकारने जारी केली आहे. त्याची संपूर्ण यादी या बातमीत पाहा.

यामध्ये दिल्ली क्राइम, ब्रुकलीन नाइन-नाइन अशा वेब सीरिज तर मर्दानी 20, छपाक, जवानी जानेमन, बाहुबली अशा चित्रपटांचा समावेश आहे.

या यादीतील कोणतीही वेबसीरिज तुम्ही पाहत असाल, चित्रपट ऑनलाइन पाहत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध राहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हॅकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करतील, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.

(संकलन- अरुंधती)

First published:

Tags: China, Tiktok