AC-फ्रिज आणि वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार; हे आहे कारण!

मागील वर्षी केंद्र सरकारने 19 लग्जरी वस्तूंच्या आयात कर वाढवला होता. आता सरकार पुन्हा काही महागड्या वस्तूंवर सेवा कर वाढवण्याच्या तयारीत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 06:10 PM IST

AC-फ्रिज आणि वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार; हे आहे कारण!

18 मार्च, नवी दिल्ली :  एअर कंडीशनर (AC), रेफ्रिजरेटर, वॉशिंग-मशीन आणि माइक्रोओव्हन या गोष्टी केवळ उच्चच नव्हे तर मध्यम वर्गातील लोकांना घरी दिसतात. पण आता या गोष्टी तुम्ही खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

केंद्र सरकार आता एअर कंडीशनर (AC),रेफ्रिजरेटर, वॉशिंग-मशीन आणि माइक्रो ओव्हन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर आयात कर वाढवणार आहे. आयात कर वाढवल्यामुळे या वस्तूंची किंमत महागण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच केंद्र सरकारने 19 महागड्या वस्तूंवर आयात कर मोठ्या प्रमाणात वाढवला होता. वाणिज्य मंत्रालय एसी आणि रेफ्रिजरेटर मधील कंप्रेसर आणि कंडेन्सर बनवण्यासाठी स्टील शीट आणि कॉपर ट्यूबवर  कस्टम ड्यूटी वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. सरकारने मागच्या वर्षी कंप्रेसरवरील आयात कर 7.5% वरून 10% इतका वाढवला आहे. एसी, रेफ्रिजरेटर आणि 10 किलोपेक्षा कमी क्षमता असणाऱ्या वॉशिंग मशीनींवर आयात कर दुप्पट वाढवून 20% कर वाढवला.

बिजनेस स्टॅंडर्डच्या बातमीनुसार सरकारने आयात कर वाढवला तर या वस्तू बनवण्याच्या अडचणी वाढू शकतात. मागच्या वर्षी आयात कर वाढल्यानंतर या वस्तू बनवताना 3-5% तोटा सहन करावा लागला होता. आताही आयात कर वाढल्यामुळे देशी कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.


VIDEO: 'पर्रिकर संसदेत अचानक मराठी बोलायचे आणि...'

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...