बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 51 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 51 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसरच्या 300 पदांसाठी नोकरीची संधी आहे. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर: तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदांसाठी 300 जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. जनरल ऑफिसर स्केल कक पदांसाठी 200 तर जनरलिस्ट ऑफिसर स्केल ककक पदासाठी 100 जागा असल्याची माहिती मिळत आहे. याचा फॉर्म कसा भरायचा, परीक्षा कधी आणि किती पगार असणार आहे जाणून घ्या सविस्तर.

एकूण रिक्त पद 300- अनारक्षित-122

जनरलिस्ट ऑफिसर (स्केल-कक) रिक्त पद :  200  (अनारक्षित पद -81)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणं मिळवलेले असणं आवश्यक आहे. संगणकाची प्राथमिक माहिती असणं आवश्यतक आहे.

पात्रता

या पदासाठी उमेदवाराला अर्ज भरायचा असेल तर किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 35 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत उमेदवाराचे वय 35 किंवा 38 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. स्केल-कक पदांसाठी साधारण 31 हजार 705 ते 45 हजार 950 रुपये पगार असू शकतो. तर स्केल कककसाठी 42 हजार 20 ते 51 हजार 490 रुपये पगार असू शकतो.

वाचा-तुमच्या स्मार्टफोनचा विमा काढलात का? होणार नाही नुकसान

निवड प्रक्रिया कशी असेल

उमेदवाराला आधी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ते झालं की पेमेंट प्रोसेस करावी लागेल. उमेदवाराची पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा होईल. परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवाराची मुलाखत होईल आणि त्यातून निवड करण्यात येईल.

जनरल आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी एक हजार 180 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. एससी, एसटी श्रेणीसाठी 118 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईन स्वरुपात भरणं बंधनकारक आहे. तुम्ही नेटबँकिंग, क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड स्वरुपात पैसे भरू शकता.

दिव्यांगांसाठी या उमेदवारी पदासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

उमेदवाराने अर्ज करण्यासाठी (www.bankofmaharashtra.in)या संकेत स्थळाला भेट द्यावी. होमपेज ओपन केल्यानंतर वर दिलेल्या ऑपशनवर सिलेक्ट करावं. हे केल्यावर तुम्हाला एक नवीन वेबपेज दिसेल.  तिथे करियर ऑप्शनवर कर क्लिक करा. करियर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तिथे क्लिक करून फॉर्म भरू शकता.

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नसली झाली तरी फेब्रुवारी किंवा मार्च 2020 दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा-कार चालवणाऱ्या 10 वर्षीय मुलाची फाडली पावती, VIDEO VIRAl

Published by: Akshay Shitole
First published: December 17, 2019, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading