अंड्यासाठी काहीही...पत्नीने प्रियकरासोबत काढला पळ, वाचा काय आहे किस्सा

अंड खायला न मिळाल्यानं पत्नीने पतीसोबत भांडण करून घर सोडल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 10:30 AM IST

अंड्यासाठी काहीही...पत्नीने प्रियकरासोबत काढला पळ, वाचा काय आहे किस्सा

गोरखपूर, 28 ऑक्टोबर: अंड खाल्ल नाही तर दिवस सरणार नाही अशी अवस्था काहींची असते तर अंड खाण्यासाठी काहीपण असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोज अंड खायला न मिळाल्यानं पत्नी घरातून पळून गेल्याची घटना समोर आली.

नेमकं काय आहे प्रकरण

चार महिन्यांपूर्वी महिलेनं प्रियकारासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेचा पती हा रोजंदारीवर काम करुन रोजची भूक भागवायचा. अशातच आपल्या बायकोचे असे रोजचे लाड पुरवणं म्हणजे पतीच्या खिशाला कात्री असल्यानं त्याने नकार दिला. रोज अंड आणायला परवडत नाही त्यामुळे त्याने पत्नीला अंड खाण्यास मनाई केली. अंड न खायला मिळाल्यानं वैतागलेल्या महिलेनं चार महिन्यांनंतर अखेर घरातून पळ काढला. या आधीही महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र काही दिवसांत महिला परत आली मात्र यावेळी अंड्यावरुन वाद झाल्यानंतर तिने पुन्हा घरातून पळ काढला आहे.

'मला माझा नवरा रोज अंड खायला देत नाही'. अशी महिलेनं पतीची रितसर पोलिसात तक्रार दाखल केली. शनिवारी रात्री महिलेचं पतीसोबत अंड खाण्यावरुन मोठं भांडण झालं. त्या भांडणानंतर महिलेनं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तर पतीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला. तेव्हा प्रियकराच्या घरालाही कुलूप होते. महिला आणि प्रियकर पळून गेल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे. दरम्यान या प्रकऱणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

रोजंदारीमुळे रोज पत्नीला अंड खायला देणं खिशाला परवडत नाही. त्याचाच फायदा प्रियकराने घेतला आणि त्याने माझ्या पत्नीला फूस लावून पळवून नेलं असल्याचा आरोप पतीने केला आहे. अंड खाण्याची आवड असल्यामुळे त्याचा फायदा प्रियकराने घेतल्याचा आरोप पतीने केला आहे. पतीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

Loading...

VIDEO: पुण्यात भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Gorakhpur
First Published: Oct 28, 2019 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...